अंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदी यांची २५३ कोटीची मालमत्ता कह्यात घेतली !

मुंबई – पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यातील आरोपी आणि हिर्‍यांचा व्यापारी नीरव मोदी याची २५३ कोटी ६२ लाख रुपयांची ‘हाँगकाँग’मधील मालमत्ता केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनमधील कारागृहात आहे.


पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याच्या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडूनही केले जात आहे. भारत सरकारने नीरव मोदी याला फरार घोषित केले आहे. नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.