मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्य यांचे त्यागपत्र !

मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता. मला बहुमत चाचणीचा खेळ खेळायचा नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच दगा दिला. बंडखोरांना काही कमी न करता त्यांना मोठे करून मी पापाची फळे भोगत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतःच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

आज महाराष्ट्र सरकारची परीक्षा : बहुमत सिद्ध करावे लागणार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील विश्‍वासदर्शक ठराव आणि राज्य सरकारने बहुमत सिद्ध करणे, या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाकडून जिहादी मारेकर्‍यांचा ‘ग्राहक’ असा उल्लेख !

मारेकरी ‘हिंदू’ असते, तर अशी बातमी दिली गेली असती का ?

हिंदूंनो, जागो व्हा !

प्रेयसीच्या केसांतून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली, तर आणि तरच कदाचित् हा हिंदुस्तान जगू शकेल’, असे वाक्य असलेली पोस्ट अभिनेते शरद यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर केवळ २ पर्याय उरले !

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ५३, काँग्रेस ४४ आणि शिवसेनेकडे १६, असे संख्याबळ आहे. महाविकास आघाडी सरकारकडे असलेले हे संख्याबळ पहाता सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले जात आहे.

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्याचा प्रस्ताव संमत !

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव २९ जून या दिवशीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला.

उदयपूरची घटना ही भारतातील १०० कोटी हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्‍न ! – हिंदु जनजागृती समिती

या घटनेवरून हिंदु समाजाने जागृत होऊन संघटित होण्याची आवश्यकता आहे. हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी घेतली काशी पिठाधीश्वरांची भेट !

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी २६ जून या दिवशी सोलापूर येथील काशी पीठाचे पिठाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेतली. या वेळी दोघांनी देशातील विविध धार्मिक आणि आध्यात्मिक प्रश्नांवर चर्चा केली.

अरबी समुद्रात ओ.एन्.जी.सी.चे हेलिकॉप्टर तातडीने उतरवले !

ओ.एन्.जी.सी.नेही त्यांचे बचाव पथक पाठवून प्रवाशांची सुटका केली. यात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांवर उपचार चालू आहेत.

मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरे यांची ५ घंटे चौकशी !

जयकुमार गोरे यांना सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी २ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्यांना सर्वाेच्च न्यायालयाने १ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.