दौंड येथील ४ अवैध शाळांना १४ लाखांचा दंड !

दौंड (पुणे) – तालुक्यातील शासनाच्या अनुमतीविना चालू असलेल्या ३ अनधिकृत शाळा आणि परस्पर ठिकाण पालटणारी एक शाळा अशा एकूण ४ शाळांना १४ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दंड केलेल्या शाळा दौंड पंचायत समिती प्रशासनाने बंद केल्या आहेत.

ग्रामपंचायत हद्दीत बालाजीनगर येथे शाळेची अनुमती आणि नोंदणी असतांना श्री मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम शाळेचे लिंगाळी रस्त्याजवळील अशोकनगर येथे परस्पर स्थलांतर केल्याने संस्थेला ११ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कासुर्डी येथील अभंग शिशुविहार बालविकास ज्ञानमंदिर शाळेतील विद्यार्थी एंजल ग्लोबल स्कूल येथे, तर कासुर्डी येथील क्रेयॉन्स इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील ७० विद्यार्थी वाघेश्वर इंग्लिश शाळेत दाखवण्यात आले आहेत. लिंगाळी येथील ज्ञानप्रभा इंग्रजी माध्यमातील शाळा अनधिकृतपणे चालू आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या अधिकृत शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

शिक्षणासंस्थांनाही बाजारी स्वरूप कसे प्राप्त झाले आहे, याचीच ही उदाहरणे आहेत !