तळोजा येथे आग विझवतांना अग्नीशमन दलातील जवानाचा गुदमरून मृत्यू

आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्नीशमन दलाच्या बाळू देशमुख जवानाचा गुदमरून मृत्यू झाला.

अपंगत्वाचे निदान झालेल्या ८० टक्के बालकांच्या उपचारात खंड पडत असल्याचा निष्कर्ष

बालकांच्या उपचारात हलगर्जीपणा करणारा आरोग्यविभाग !

पाळधी (जिल्हा जळगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात टिपू सुलतानचे छायाचित्र लावणार्‍या धर्मांधांना अटक करा !

धर्मांधांनी ग्रामपंचायत कार्यालयात हिंदू महिलांवर अत्याचार, मंदिरांचा विध्वंस, हिंदु धर्मावर आघात करणार्‍या टिपू सुलतानचे छायाचित्र बळजोरीने लावले.

हिंदवी स्वराज्य समूहाच्या वतीने तालुकास्तरीय किल्ला स्पर्धांचे बक्षीस वितरण 

प्रथम क्रमांकाचे बक्षीस मोठ्या गटात छत्रपती शिवाजी महाराज चौक (राजगड) आणि विश्‍वजीत पाटील (राजगड) यांना देण्यात आले.

अमित चांदोले यांची कोठडी वाढवण्याची अंमलबजावणी संचालनालयाची मागणी

चांदोले यांच्याकडून प्रताप सरनाईक यांना पैसे जात होते, असे पुराव्यांतून दिसत आहे.

महाराष्ट्र शासन मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथील ३२ सहस्र हेक्टर कांदळवनाला ‘राखीव वन’ घोषित करणार

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कांदळवनाचे संरक्षण करण्याविषयीच्या हरकती आणि दावे यांची चौकशी तातडीने पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.

रणजित डिसले यांची राज्यपाल नियुक्त जागेवर शिफारस करणार ! – प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

रणजित डिसले यांची विधान परिषदेच्या १२ जागांपैकी एका जागेसाठी शिफारस करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘इतर शिक्षकांनी आदर्श घ्यावा अशी कामगिरी डिसले यांची आहे. राज्याच्या विधीमंडळात डिसले यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहे.’’

वीजदेयकांच्या अडचणींविषयी वीजवितरणचे अधिकारी वीजग्राहकांच्या भेटीला

कणकवली आणि मालवण परिसरातील वीजग्राहकांना वीजदेयकांविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य वीज वितरण आस्थापनाचे (महावितरणचे) अधिकारी ग्राहकांच्या जवळच्या कार्यालयामध्ये ७ ते १२ डिसेंबर या कालावधीत उपस्थित रहाणार आहेत

कणकवली येथे परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सवास १७ डिसेंबरपासून प्रारंभ

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील ७ वनक्षेत्रांना ‘संवर्धन राखीव क्षेत्रा’चा दर्जा 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत वन्यजिवांचा प्रामुख्याने वाघांचा ‘कॉरिडॉर’ असलेल्या  कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण ८६ सहस्र ५५४ हेक्टरच्या वनक्षेत्राला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण मिळणार आहे.