मुंबई – महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता आहे, असे मत विधीमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.
#Shivsena Symbol : शिवसेना कुणाची हा निर्णय देण्याआधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह ठाकरे किंवा शिंदे अशा कोणत्याही एका गटाला न देता कायमस्वरुपी गोठवू शकते : डॉ. अनंत कळसे https://t.co/ytimknwVr1 @Manshreepathak
— ABP माझा (@abpmajhatv) July 23, 2022
‘शिवसेना कुणाची ?’ हा निर्णय देण्याआधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह ठाकरे किंवा शिंदे अशा कोणत्याही एका गटाला न देता कायमस्वरूपी गोठवू शकते. अशा स्थितीत दोन्ही गटाला नव्या चिन्हासह निवडणुका लढवाव्या लागतील. शिवसेना नेमकी कुणाची, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कि शिंदे गट यांची ?, याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.