अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने मडगाव आणि फोंडा (गोवा) पोलिसांकडून दक्षतेचे उपाय

अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आणि ईदचा जुलूस शांततेने पार पडावा, यासाठी गोवा पोलिसांचे बैठका घेऊन आवाहन !

म्हापसा (गोवा) येथे भटक्या कुत्र्याने आक्रमण केल्याने शाळकरी मुलीच्या पायाचे हाड मोडले

भौतिक विकासाचा लखलखाट; पण नागरिकांच्या प्राथमिक समस्या आहेत तशाच !

पर्यटन व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

येत्या ४-५ वर्षात आदरातिथ्य क्षेत्रात सुमारे २ लाख तरुणांना रोजगार देण्याची क्षमता ! ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘व्होकल फॉर ग्लोबल’ या संकल्पनांना चालना देण्यासाठी उद्योग समर्थनाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.

गोव्यात किशोरवयीन मुली गर्भवती होण्याचे वाढते प्रकार चिंताजनक ! 

धर्मशिक्षण आणि साधना यांअभावी समाजाची झालेली ही अधोगती आहे ! मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला स्वैराचार, लिव्ह इन रिलेशनशिपसारखी विकृती, अश्‍लील चलचित्रे, आदी गोष्टी यास कारणीभूत आहेत !

गोवा : सरकारच्या ‘टेलीमानस’ योजनेच्या अंतर्गत एका वर्षात १ सहस्र जणांनी केला संपर्क !

केवळ समुपदेशाने मानसिक समस्या सुटणार नाहीत. त्याला अध्यात्माची (साधनेची) जोड देणे आवश्यक आहे. अनेक सोयीसुविधा, भौतिक विकास आदी साध्य करूनही मोठ्या प्रमाणात नागरिक मानसिक रुग्ण का बनत आहेत ?

कारागृहात जाऊन बंदीवानांशी वार्तालाप करण्याच्या चर्चच्या मोहिमेला अनुमती देऊ नये ! – हिंदु रक्षा महाआघाडी

‘सरकार खर्च करत असलेल्या निधीव्यतिरिक्त बंदीवानांसाठीची ही मोहीम कमकुवत मनःस्थितीतील बंदीवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना हेरून त्यांचा बुद्धीभेद करून धर्मांतर घडवण्यासाठीच चर्चने योजली आहे’, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे म्हणणे आहे.

कुंकळ्ळी (गोवा) येथील विनयभंग प्रकरणी शारीरिक शिक्षकाच्या बडतर्फीची शिफारस

या शिक्षकाने केपे तालुक्यातील एका शाळेत शिकवत असतांनाही एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता, असे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे.

मागील साडेचार वर्षांत गोव्यातील साडेसहा सहस्र युवक मद्य किंवा अमली पदार्थ व्यसनांच्या आहारी !

सनबर्नसारख्या कार्यक्रमांत अमली पदार्थ, मद्य यांचा सर्रास होत असलेला वापर या स्थितीला उत्तरदायी आहे ! युवकांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, यासाठी सर्वांना साधना शिकवणे आवश्यक आहे !

डेल्टा कॉर्पोरेशनला जीएसटी विभागाकडून ११ सहस्र कोटींची नोटीस

या आस्थापनाला ११ सहस्र १३९ कोटी रुपयांची पहिली नोटीस बजावली असून ५ सहस्र ६८२ कोटी रुपयांची दुसरी नोटीस या आस्थापनातील कॅसिनो डेल्टिन डेन्झॉन्ग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा या सलग्न आस्थापनांना बजावण्यात आल्या आहेत.

परराज्यातून आणलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पुजून शासनाच्या एका चांगल्या योजनेची थट्टा उडवली जात आहे ! – प्रा. राजेंद्र केरकर Ganesh Visarjan

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर कित्येक वर्षे बंदी असूनही त्या वापरल्या जाणे प्रशासनासाठी लज्जास्पद !