गोवा : नवीन ‘शॅक’ धोरण आणि खनिज डंप धोरण यांना संमती

राज्य मंत्रीमंडळाने बहुप्रतिक्षित ‘शॅक धोरण -२०२३’ आणि खनिज डंप धोरण यांना संमती दिली आहे. नवीन धोरणानुसार ९० टक्के ‘शॅक्स’चे वाटप अनुभवी ‘शॅक’ व्यावसायिक, तर उर्वरित १० टक्के ‘शॅक’ इच्छुक नवीन गोमंतकीय व्यावसायिक यांना देण्यात येणार !

गोवा : म्हार्दोळ पोलीस निरीक्षकांचे प्राथमिक अन्वेषण करण्याचा पोलीस महासंचालकांचा आदेश

‘या घटनेत पुरावे नष्ट केले, चुकीची माहिती दिली, मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आदी सर्व प्रकार म्हार्दोळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत झाले, तरीही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही.’ उच्च न्यायालयाच्या या टिपणीनंतर पोलिसांनी आदेश दिला आहे.

गोवा : प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री केल्यास कठोर कारवाई करणार !

वर्ष २०१३ पासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीवर गोव्यात बंदी असूनही १०० टक्के बंदीची कार्यवाही न होणे पर्यावरणासाठी धोकादायक असण्याबरोबरच ही स्थिती प्रशासनासाठी लज्जास्पद !

गोवा : धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून तिघांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

मद्याच्या धुंदीत असे कृत्य केल्याचे काँग्रेसवाले सांगतील; पण त्यांना मद्यधुंद अवस्थेत जन्माष्टमीचेच फलक फाडण्याचे भान कसे रहाते ? सरकारने याची गंभीर नोंद घेऊन कारवाई करावी !

गोवा : यापुढे हातात राखी बांधून शाळेत येण्यास विद्यार्थ्यांना अनुमती असेल ! – व्यवस्थापनाचा पालकांना संदेश

राख्या काढण्यास सांगणार्‍या मुख्याध्यापिकेवर विद्यालय व्यवस्थापनाने कोणती कारवाई  केली ? हेही पालकांना सांगितले पाहिजे.

भारतीय बनावटीच्‍या खेळण्‍यांच्‍या ‘इंडियन टॉईज मेला डॉट कॉम’ संकेतस्‍थळाचे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या हस्‍ते उद़्‍घाटन !

‘टॉय अँटीका (ओपिसी) प्रा.लि.’ या आस्‍थापनाच्‍या वतीने चालू करण्‍यात आलेल्‍या ‘इंडियन टॉईज मेला डॉट कॉम’ (indiantoysmela.com) या संकेतस्‍थळाचे उद़्‍घाटन ७ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

चिंबल येथील वादग्रस्त उर्दू शाळा बंद करण्याचा न्यायालयाचा आदेश

शाळेसाठी अवैधरित्या बांधलेली ३ मजली इमारत आली मोडकळीस अवैधरित्या शाळेची इमारत उभी राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

पोलीस हवालदाराकडून पोंबुर्पा येथील विवाहित महिलेचा विनयभंग

‘जनतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत’, अशी प्रतिमा पोलिसांची बनत असून जनतेमध्ये पोलिसांविषयी अविश्वास निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने पोलिसांना प्रशिक्षण देतांना साधनेद्वारे नैतिकता रुजवणे अपेक्षित आहे !

अनेक मासांनंतर विधानसभेच्या विविध समित्यांच्या बैठका होणार

‘इस्टीमेट्स’ समिती आणि आश्‍वासन समिती यांच्या अनुक्रमे ७ सप्टेंबर अन् १४ सप्टेंबर या दिवशी बैठका होणार आहेत, अशी माहिती विधानसभेच्या सचिव नम्रता उल्मन यांनी दिली आहे.

राजापूर येथे पोलिसांच्या वाहनावर गोळीबार करून पसार झालेल्या तिघांना आंबोली येथे अटक

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या वाहनावर गोळीबार करून पसार झालेल्या तिघांना सावंतवाडी पोलिसांनी आंबोली येथे कह्यात घेतले आहे, तसेच त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.