पणजी – कुंकळ्ळी येथील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केलेल्या आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या शारीरिक शिक्षकाला सेवेतून काढून टाकावे, अशी शिफारस क्रीडा खात्याने शासनाकडे केली आहे. या वृत्ताला क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनीही दुजोरा दिला आहे.
Goa Molestation Case: ‘त्या’ शिक्षकाने विद्यार्थिनीला दिली होती अपहरणाची धमकी, पोलिस जबानीत अनेक गोष्टी उघड https://t.co/z6XGioF9Zs#Goa #MolestationCase #Police #Crime #DainikGomantak
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) September 2, 2023
सध्या त्या शिक्षकाने जामिनासाठी बालन्यायालयात अर्ज केला आहे. यावर २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. या शिक्षकाने केपे तालुक्यातील एका शाळेत शिकवत असतांनाही एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता, असे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे. याविषयी पोलिसांनी सविस्तर माहिती गोळा केली असून ती जामिनावरील अर्जाच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात मांडली जाणार आहे.