म्हापसा (गोवा) येथे भटक्या कुत्र्याने आक्रमण केल्याने शाळकरी मुलीच्या पायाचे हाड मोडले

भटक्या कुत्र्याने आक्रमण केल्याची करासवाडा, म्हापसा येथील तिसरी घटना

म्हापसा, २७ सप्टेंबर (वार्ता.) : शाळेच्या परिसराच्या बाहेर एक कुत्रा मागे लागल्याने धावतांना पडल्याने एका विद्यार्थिनीच्या पायाचे हाड मोडले. विद्यार्थिनीला उपचारार्थ उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्याने आक्रमण केल्याची करासवाडा, म्हापसा येथील ही तिसरी घटना आहे.

कुत्र्याने चावा घेतल्यास ‘रॅबीस’ची लागण होण्याच्या भीतीने स्थानिकांनी म्हापसा परिसरातील भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी ‘अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल’ (प्राणी निर्बिजीकरण) कायद्याची कार्यवाही करण्याची मागणी केली आहे, तसेच सरकारने अशासकीय संस्थांना आवश्यक निधी पुरवून म्हापसा परिसरातील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मागणी केली आहे. विद्यालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर असू नये आणि मुले सुरक्षित रहावीत, यासाठी सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

 (सौजन्य : OHeraldo Goa)

संपादकीय भूमिका

भौतिक विकासाचा लखलखाट; पण नागरिकांच्या प्राथमिक समस्या आहेत तशाच !