‘भारत बंद’चा गोव्यावर परिणाम नाही

‘भारत बंद’ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष, आप आणि शिवसेना या राजकीय पक्षांनी, तसेच शेतकरी संघ, ‘अखिल भारतीय किसान सभा’, ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन’ आदींनी पाठिंबा दर्शवला होता आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीने ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते

जिल्हा पंचायत निवडणुकीवर स्थगिती आणण्यास न्यायालयाचा नकार

१२ डिसेंबर या दिवशी होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीवर स्थगिती आणण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नकार दर्शवला आहे.

६० व्या गोवा मुक्तीदिनाच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी ‘लोगो’ सिद्ध करण्यासाठी अर्ज मागवले

इच्छुकांनी हा लोगो ‘[email protected]’वर ई-मेल करायचा आहे आणि सोबत संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक द्यायचा आहे.

आतंकवादविरोधी ‘मॉक ड्रिल’मध्ये ‘ग्रेनेड’च्या स्फोटात हवालदार घायाळ

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन ‘सुपर स्पेशालिटी’ विभागाजवळ ८ डिसेंबर या दिवशी सकाळी ‘ग्रेनेड’ स्फोटाचा ‘मॉक ड्रिल’ (रंगीत तालिम) करतांना गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकातील पोलीस हवालदार जयदेव सावंत घायाळ झाला.

उसगाव येथील शिक्षिका कोरोनाबाधित

ज्येष्ठ शिक्षिका कोरोनाबाधित झाल्याने उसगाव, फोंडा येथील विद्यालयाचे इयत्ता १० वी आणि १२ वीचे वर्ग एक आठवड्यासाठी रहित करण्यात आले आहेत.

‘पी.एफ्.आय.’वर कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे मागणी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनेकडून गोव्यातील इयत्ता १० वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बाबरी मशिदीवर आधारित अखिल गोवा निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

गौरीगद्दे (कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

गौरीगद्दे (शृंगेरी, कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांनी नुकतीच येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन संस्था आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय या संस्थांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.

मिग-२९ विमान दुर्घटनेतील दुसर्‍या वैमानिकाचा मृतदेह सापडला

आय.एन्.एस्. विक्रमादित्यवरून उड्डाण केल्यानंतर २६ नोव्हेंबर या दिवशी अरबी समुद्रात मिग-२९ हे विमान कोसळले होते. या दुर्घटनेत २ पैकी एका वैमानिकाला वाचवण्यात यश आले होते.

‘भारत बंद’चा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप यांचा पाठिंबा.
आंदोलनाला पाठिंबा म्हणजे शेतकर्‍यांना लुटणार्‍या दलालांना पाठिंबा !

अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कॅनाबिसच्या लागवडीमध्ये गोव्यात वाढ

चरस, गांजा आदी अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख घटक म्हणजे ‘कॅनाबिस’ ! या रोपांची लागवड आता गोव्यात केली जात आहे. अशा प्रकारची मागील एका वर्षात ८ प्रकरणेे उघडकीस आली, तर नोव्हेंबर २०२० या एका मासातच ४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.