हे शेतकर्‍यांचे आंदोलन नसून धनदांडग्या दलालांचे आंदोलन ! – नितीन फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष, गोवा सुरक्षा मंच

शेतकर्‍यांच्या नावाखाली पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला गोवा सुरक्षा मंचचा विरोध

मोरजीतील काँग्रेस उमेदवाराचा मगोच्या उमेदवाराला पाठिंबा

राज्यात १२ डिसेंबरला होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीत मोरजीतील काँग्रेसचे उमेदवार महेश कोंडारकर यांनी मगोपचे उमेदवार श्रीधर मांजरेकर यांना पाठिंबा घोषित केला आहे.

तम्नार वीज प्रकल्पाला मोले ग्रामपंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती न्यायालयाकडून रहित

सांगोड येथे उभारण्यात येणार्‍या तम्नार वीजप्रकल्पाला मोले पंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती उच्च न्यायालयाने रहित केली आहे.

गोवा आणि बिहार या राज्यांत अनेक ठिकाणी ‘पी.एफ्.आय.’कडून लावण्यात आली बाबरी ढाचा पुन्हा उभारण्याविषयीची भित्तीपत्रके !

पी.एफ्.आय.चा अनेक देशविरोधी आणि हिंदुविरोधी कृत्यांमध्ये सहभाग असतांना केंद्र सरकार या संघटनेवर बंदी घालण्यासाठी कुणाची वाट पहात आहे ?

वास्को येथे अनधिकृत भूमीत मदरसा उभारण्यास हिंदु संघटनांचा विरोध

भूमीच्या मालकाने संबंधित ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक स्थळ उभारले जाणार नसल्याची हमी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दिली.

गोव्यातील राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार

गोव्यातील सर्व राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ता वाहतूक आणि हमरस्ता खात्याचे  पदाधिकारी पांडे यांनी चालू असलेल्या कामांची पहाणी केल्यानंतर दिली.

काणकोण आणि नागोवा येथून अमली पदार्थ कह्यात

काणकोण पोलिसांनी गालजीबाग, काणकोण येथे एका कारवाईत मूळचा पश्‍चिम बंगाल येथील एक नागरिक त्रिदीप नंदी याच्याकडून ४ लाख ५० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले.

जिल्हा पंचायत निवडणूक १२ डिसेंबरला, तर मतमोजणी १४ डिसेंबरला

राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक शनिवार, १२ डिसेंबर, तर मतमोजणी १४ डिसेंबर या दिवशी होणार आहे. गोवा राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

१ जानेवारीला शाळांना सुटी द्या !

ख्रिस्ती नववर्षाच्या प्रारंभी १ जानेवारीला शाळांना सुटी देण्याची मागणी गोव्यातील डायोसेसन सोसायटीच्या शिक्षकांच्या एका गटाने शिक्षण खात्याचे संचालक संतोष आमोणकर यांची भेट घेऊन केली आहे.

फेस्ताच्या निमित्ताने पार्टी करणार्‍या नेत्यांवर कारवाई करा ! – प्रतिमा कुतिन्हो, अध्यक्ष, महिला काँग्रेस

फेस्ताच्या निमित्ताने मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून एकत्र येऊन ‘पार्टी’ करणार्‍या नेत्यांवरही गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी महिला काँग्रेसच्या गोवा प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे.