६० व्या गोवा मुक्तीदिनाच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी ‘लोगो’ सिद्ध करण्यासाठी अर्ज मागवले

पणजी, ८ डिसेंबर (वार्ता.) – ६० व्या गोवा मुक्तीदिनाच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी ‘लोगो’ सिद्ध करण्यासाठी गोवा शासनाने अर्ज मागवले आहेत. हा ‘लोगो’ पुढे प्रत्येक शासकीय कामासाठी वापरला जाणार आहे. इच्छुकांनी हा लोगो ‘[email protected]’वर ई-मेल करायचा आहे आणि सोबत संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक द्यायचा आहे. केवळ गोमंतकियांसाठी ही स्पर्धा खुली आहे. १४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज येणे अपेक्षित आहे. यातील विजेत्याला १० सहस्र रुपये रोख रक्कम पारितोषिक दिले जाणार आहे.