चीनचे ‘जुराँग’ रोव्हर मंगळावर उतरले !

चीनचे ‘जुराँग’ रोव्हर मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरले आहे. यामुळे मंगळावर रोव्हर उतरवणारा चीन दुसरा देश ठरला आहे. ७ मासांचा अंतराळातील प्रवास आणि ३ मास मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवास केल्यानंतर शेवटच्या ९ मिनिटांच्या प्रवासानंतर जुराँग रोव्हर मंगळावर उतरले.

शत्रूराष्ट्रांची आरोग्य व्यवस्था बिघडवण्यासाठी चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला ! – चीनच्या महिला डॉक्टरचा दावा

चीनने वर्ष २०१५ पासूनच जागतिक युद्धासाठी जैविक शस्त्र बनवण्यास प्रारंभ केल्याचे चीनच्या तज्ञांच्या अहवालाद्वारे अमेरिकेच्या गुप्तचरांनी उघड केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. ली मेंग यान यांनी त्यांची मते मांडली.

चीनची गलवान खोर्‍यात युद्धसिद्धता !

चीनशी पुन्हा संघर्ष झाल्यास भारताने बचावात्मक पवित्रा न घेतला चीनवर प्रतिआक्रमण करून त्याला पराजित करण्यासाठीच प्रयत्न करावेत !

चीनकडून भुतानच्या गावामध्ये घुसखोरी करून त्यावर अवैध नियंत्रण

भारताला लागून असलेल्या देशांमध्ये अतिक्रमण करून चीन भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून दिसून येते !

चीनच्या अनियंत्रित रॉकेटचे अवशेष हिंद महासागरात कोसळले !

चीनचे अनियंत्रित झालेले रॉकेटचे अवशेष अखेर ९ मे या दिवशी सकाळी हिंद महासागरात कोसळले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्या रॉकेटचे बरेचसे भाग नष्ट झाले. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने हे अवशेष पेनिन्सुलामध्ये सापडल्याचे सांगण्यात आले होते.

कोरोनावर मात करण्यासाठी चीनमध्ये गायीचे दूध पिण्यासाठी आग्रह !

कुठे गायीच्या दुधाचे महत्त्व उमगलेला चीन, तर कुठे गायीचे रक्षण करू न शकणारा भारत !

८ मेच्या दिवशी चीनचे नियंत्रण गमावलेले रॉकेट पृथ्वीवरील नागरी भागांत कोसळण्याची शक्यता ! – अमेरिका

चीनने अवकाशात पाठवलेले रॉकेट समुद्रात कोसळणार होते मात्र त्याआधीच नियंत्रण गमावल्याने ते पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

चीनकडून भारतातील कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न !

एकीकडे चीन भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी साहाय्य करणार असल्याचे सांगतो, तर दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंविषयी खिल्ली उडवतो, हे लक्षात घ्या !

चीन सैन्याकडून तिबेटमध्ये नवीन कमांडरची गुपचूप नियुक्ती

चीन विश्वासघातकी असल्याने त्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून भारताने सतर्क रहाणेच योग्य आहे ! चीनने कुरापत केली, तर त्याला जशास तसे उत्तर देण्याची सिद्धता भारताने केली पाहिजे !

(म्हणे) ‘कोरोनाच्या वाढत्या संसर्गापासून लक्ष वळवण्यासाठी भारत सीमेवर कुरापती काढू शकतो !’

भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा अपलाभ घेत चीनच सीमेवर कुरापत काढू शकतो, असेच भारतियांना वाटते; मात्र ‘आम्ही तसे नाही’, असे दाखवण्यासाठी आणि जगाची दिशाभूल करण्यासाठी चीन सरकारचे मुखपत्र अशा प्रकारचा कांगावा करत आहे !