बीजिंग – चीनची तिसरी विमानवाहू युद्धनौका समुद्रात तैनात करण्यात आली आहे. ‘फुजियान’ असे या नौकेचे नाव आहे. ही जगातील दुसर्या क्रमांकाची सर्वांत मोठी विमानवाहू युद्धनौका आहे. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका पहिल्या क्रमांकावर आहे.
चीन त्याच्या नौदलाची ताकद सातत्याने वाढवत आहे. या अंतर्गत तो पाणबुड्या आणि युद्धनौका यांची संख्या सातत्याने वाढवत आहे. चीन जवळजवळ प्रत्येक महिन्याला एक नौदल जहाज बांधत असल्याचे सांगितले जात आहे.