China Space War : चीनच्या गुप्तचर उपग्रहांच्या संख्येत तिप्पट वाढ : ‘स्टार वॉर्स आर्मी’ची सिद्धता !

बीजिंग – चीन अंतराळात मोठ्या प्रमाणावर ‘स्टार वॉर्स आर्मी’ सिद्ध करत आहे. चीनने ६ वर्षांत त्याच्या गुप्तचर उपग्रहांच्या संख्येत तिप्पट वाढ केली आहे. तैवानवर आक्रमण करण्यासाठी चीन त्याचा वापर करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना इंडो-पॅसिफिक प्रदेश पाश्‍चात्य देशांच्या प्रभावापासून मुक्त ठेवायचा आहे. ‘यूएस स्पेस फोर्स’ने या आठवड्यात चेतावणी दिली की, चीनकडे अनुमाने ३५० पाळत ठेवणारे उपग्रह आहेत, ज्यामध्ये वर्ष २०१८ पासून ३०० टक्क्यांनी वाढ झाली  आहे.

‘द सन‘ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या ‘स्पेस डेल्टा-२ फोर्स’चे कमांडर कर्नल राज अग्रवाल यांनी सांगितले की, चीन नवीन अंतराळ शर्यतीद्वारे त्याची सैन्यशक्ती वाढवत आहे. ‘स्पेस फोर्स इंटेलिजेंस स्क्वाड्रन’चे प्रमुख लेफ्टनंट कर्नल ट्रॅव्हिस अँडरसन यांनी सांगितले की, चीनने स्वतःला अशा प्रकारे सिद्ध केले आहे की, ते इंडो-पॅसिफिकमध्ये अमेरिकन आणि सहयोगी सैन्याची जहाजे शोधू शकतात.