China Moon Mission : चंद्रावर उतरलेले चीनचे यान येत आहे माघारी !

चंद्रावरील २ किलो माती आणणार

बीजिंग (चीन) – चीनचे चंद्राच्या गडद अंधाराच्या भागात यशस्वीपणे उतरलेले ‘चांगई-३’ हे यान आता माघारी येत आहे. नियोजनानुसार येत्या २५ जूनला हे यान मंगोलियाच्या वाळवंटात उतरणार आहे. चंद्रावर उतरल्यानंतर या यानाने चंद्रावरील अनुमाने २ किलो माती गोळा केली असून ती समवेत आणली जात आहे. ही माती गोळा करण्यासाठी या यानावर खोदकाम करण्यासाठी आणि नंतर ढिगारा उचलण्यासाठी यांत्रिक हात बसवण्यात आले होते.

चंद्रावरून आणण्यात येणार्‍या या मातीचे विश्‍लेषण करण्यात येणार आहे. त्याद्वारे शास्त्रज्ञ चंद्र, पृथ्वी, सौर मंडळाची निर्मिती अन् उत्क्रांती यांच्याविषयी अधिक माहिती मिळवू शकतील.