US Teachers Stabbed : चीनमध्ये दिवसाढवळ्या ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण !

जिलिन (चीन) – चीनच्या जिलिन शहरात १० जून या दिवशी ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. यात हे सर्व जण गंभीररित्या घायाळ झाले. यात एक शिक्षिकेचाही समावेश आहे.

अमेरिकेतील आयोवा राज्यातील कॉर्नेल महाविद्यालयामधील हे सर्व शिक्षक एका सार्वजनिक उद्यानात उपस्थित होते. त्या वेळी त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. हे आक्रमण कुणी आणि का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘आम्ही सर्व शिक्षकांच्या संपर्कात आहोत’, असे महाविद्यालयाच्या प्रशासनाने म्हटले आहे. त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जात आहे.

याआधीही चीनमध्ये शाळा, रुग्णालये आणि उद्याने यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी अनेकदा चाकूद्वारे आक्रमण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.