‘वाईट शक्तींमुळे वास्तूतील लादींवर रक्ताचे डाग उमटण्याची कारणे, त्यामागील सूक्ष्म प्रक्रिया, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील आध्यात्मिक उपाय’, यांसंदर्भातील विश्लेषण !

‘देश-विदेशांतील वास्तूत लोकांना स्थुलातील कुठलेली कारण नसतांना अकस्मात् रक्ताचे डाग आढळतात. हे डाग वाईट शक्तींमुळे निर्माण होतात; परंतु ‘त्या असे का करतात ? मनुष्यावर आक्रमण करण्यासाठी त्या रक्ताचाच उपयोग का करतात ? ही प्रक्रिया सूक्ष्मातून कशी घडते ?’ इत्यादी प्रश्नांची उत्तरे पुढे दिली आहेत.

श्री. राम होनप

१. ‘वाईट शक्ती मनुष्यावर रक्ताच्या डागांच्या माध्यमातून आक्रमणे करतात’, यामागील कारणे

अ. वाईट शक्तींना ‘स्वतःच्या मनाविरूद्ध काहीतरी घडले आहे’, याची जाणीव झाल्यावर त्या चिडतात आणि ही चीड ते मनुष्यावर रक्ताचे डाग उमटून व्यक्त करतात.

आ. वाईट शक्ती आणि एखादी व्यक्ती किंवा कुटुंब यांच्यात देवाण-घेवाण हिशोब असल्यास वाईट शक्ती त्रास देतात.

इ. एखादी व्यक्ती साधनेकडे वळल्यास वाईट शक्तींना ते आवडत नाही. त्यामुळे वाईट शक्तीच्या कार्याला खीळ बसण्याची शक्यता असते. त्याला वाईट शक्ती विरोध करतात.

ई. ज्या वास्तूत ‘धर्मकार्य परिणामकारक चालू आहे किंवा तेथे चैतन्याचे प्रमाण अधिक आहे’, अशा ठिकांणी वाईट शक्तींचे विशेष लक्ष असते. ‘अशा वास्तूतील चैतन्य नष्ट करणे अथवा धर्मकार्याला रोखणे’, यांसाठी वाईट शक्ती अधिकाधिक आक्रमक होऊन लढतात.

२. ‘वाईट शक्ती व्यक्तीवर आक्रमणासाठी बहुतेक वेळा रक्ताचाच उपयोग का करतात ?’ यामागील कारणे !

अ. वाईट शक्तींचा रक्त प्राप्त करण्याचा स्रोत जिवंत किंवा मृत मनुष्य, प्राणी आणि पक्षी हे असतात. या घटकांमधील ‘हाड’ आणि ‘मास’ यांत ‘पृथ्वी’ आणि ‘आप’ तत्त्व असते, तर रक्तात ‘आप’ तत्त्व अधिक प्रमाणात असते. वाईट शक्ती ‘वायु’ तत्त्वाच्या असतात. त्यांना हाड आणि मास यांच्या तुलनेत रक्तातील ऊर्जा ग्रहण करणे सुलभ असते. त्यामुळे वाईट शक्तींना रक्त प्रिय असते.

आ. वाईट शक्तींना अन्य घटकांद्वारे प्राप्त होणार्‍या रक्तातून वाईट कार्य करण्यासाठी शक्ती प्राप्त होते.

३. वाईट शक्तींनी सूक्ष्मातून रक्त प्राशन करण्याच्या पद्धती

३ अ. नाकाद्वारे : वाईट शक्ती सूक्ष्मातून स्वतःच्या नाकाद्वारे जिवंत किंवा मृत मनुष्य, प्राणी आणि पक्षी यांच्यातील रक्त शोषून घेतात. हे रक्त सूक्ष्म ऊर्जेच्या स्वरूपात असते. त्यात ‘रक्ताचा रंग’, ‘ओलावा’ आणि ‘रक्तातील गुणधर्म’ यांचा समावेश असतो.

३ आ. जिभेद्वारे : वाईट शक्ती सूक्ष्मातून स्वतःच्या जिभेद्वारे जिवंत किंवा मृत मनुष्य, प्राणी आणि पक्षी यांच्यातील रक्ताचा आस्वाद घेतात आणि ते प्राशन करतात.

४. वाईट शक्तीने ‘नाकाद्वारे रक्त शोषून घेणे आणि जिभेद्वारे रक्ताचा आस्वाद घेणे’, यांतील भेद

‘वाईट शक्तीने सूक्ष्मातून स्वतःच्या नाकाद्वारे जिवंत किंवा मृत मनुष्य, प्राणी आणि पक्षी यांच्यातील रक्त शोषून घेणे’, ही जिभेच्या तुलनेत अधिक सूक्ष्म प्रक्रिया आहे. वाईट शक्तीला नाकाद्वारे रक्तातून प्राप्त झालेल्या ऊर्जेत ‘रक्ताचा रंग’, ‘ओलावा’ आणि ‘रक्तातील गुणधर्म’ असतात आणि जिभेद्वारे ग्रहण केलेल्या रक्तात ‘रक्ताचा रंग’ आणि ‘ओलावा’ असतो; परंतु त्यात रक्तातील गुणधर्म नसतात.

५. वाईट शक्तींनी अन्य घटकांद्वारे प्राप्त केलेले रक्त सूक्ष्मातून स्वतःत साठवण्याची पद्धत

जिवंत किंवा मृत मनुष्य, प्राणी आणि पक्षी यांच्यातील शोषून घेतलेले रक्त वाईट शक्ती स्वतःच्या मनोमयकोषात साठवतात. त्या वेळी या रक्ताचे रूपांतर काळ्या शक्तीत होते.

६. वाईट शक्तींनी सूक्ष्मातून मनुष्यावर केलेल्या आक्रमणात लादींवर रक्ताचे डाग उमटण्यामागील प्रक्रिया

वाईट शक्ती वास्तूतील लादींवर रक्ताच्या डागांद्वारे आक्रमण करते. त्यापूर्वी वाईट शक्ती रागाने त्या लादींवर तिची काळी शक्ती सोडते. त्यात सुप्त स्वरूपात असलेले रक्त आणि त्याचा ओलावा लादींवर डागांच्या स्वरूपात व्यक्त होतो.

७. वाईट शक्तींमुळे लादींवर उमटलेल्या रक्ताच्या डागांचा मनुष्यावरील परिणाम

वाईट शक्तींनी लाद्यांवर उमटवलेल्या रक्तात अभिमंत्रित काळी शक्ती असते. तिचा परिणाम वास्तू आणि व्यक्ती यांवर पुढीलप्रमाणे होतो.

अ. वास्तूतील सत्त्वगुण अल्प होते. त्यामुळे ती काही काळ दूषित होते.

आ. व्यक्तीचे मन चंचल होऊन तिच्यात अस्वस्थता निर्माण होते.

इ. कौटुंबिक वाद निर्माण होतात.

८. वाईट शक्तींमुळे लादींवर रक्ताचे डाग उमटल्यावर करावयाचे उपाय

अ. पाण्यात उदबत्तीची चिमूटभर विभूती किंवा गोमूत्राचे ४ – ५ थेंब घालावे. त्या पाण्यात लादी पुसण्याचे कापड ओले करून त्या कापडाने रक्ताचे डाग पूसून घ्यावेत.

आ. त्यानंतर ते कापड पाण्याने स्वच्छ धुवावे. कापडावर थोडी विभूती किंवा गोमूत्र शिंपडावे. त्यामुळे कापडावरील रक्ताच्या डागांचा नकारात्मक परिणाम निघून जातो.

इ. उद्बत्ती किंवा धूप यांद्वारे वास्तूची शुद्धी करावी.

ई. त्यानंतर घरातील सर्वांनी किमान १ घंटा उपास्य देवतेचा एकाग्रतेने नामजप करावा.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.