राष्ट्र बनते ते कसे ?

पू. गोळवलकरगुरुजी

राष्ट्र श्रद्धेमुळे सिद्ध होते. जर कुणी उत्कट श्रद्धा बाळगून असेल आणि दुसरा एखादा त्याच भूमीतील मनुष्य समुदाय त्या भूमीविषयी श्रद्धा बाळगून नसेल, तर श्रद्धा नसणारा मनुष्य समुदाय त्या राष्ट्राचा घटक नव्हे. तिच्याप्रती श्रद्धा बाळगून, तिला स्वतःची माता समजून आणि स्वतःला त्या भूमीचा पुत्र मानून जगत असतो अन् त्याची जीवनप्रणाली, भविष्यकालीन आकांक्षा, ऐतिहासिक परंपरा, तसेच वंदनीय महापुरुष हे सर्व एकच असतात, तेव्हा त्या मनुष्यसमुदायाचे राष्ट्र बनत असते.

– पू. गोळवलकरगुरुजी, द्वितीय सरसंघचालक, रा.स्व. संघ

(साभार : साप्ताहिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’)