संघटनाचे महत्त्व !

‘हे हिंदूंनो! तुम्‍ही दुर्बल आहात; म्‍हणून सगळे जग जरी ओरडत सुटले, तरीही तुम्‍ही आपला तेजोभंग होऊ देऊ नका. या सगळ्‍या आरडाओरडीची मुस्‍कटदाबी एका विक्रमादित्‍याचे नावाने करू शकेल. या सर्व पोकळ धमक्‍या एकट्या शिवबाच्‍या पुण्‍यस्‍मरणाने जागच्‍या जागी जिरून जातील. तुमचा इतिहास तर अशा अनेक विक्रमादित्‍यांनी, समुद्रगुप्‍तांनी आणि शिवबांनी भरलेला आहे. फक्‍त संघटन करून मनात आणा, म्‍हणजे आज गेली पाच सहस्र वर्षे तुम्‍ही जसे सर्वांना पुरून उरला आहात, तसेच त्‍या कोदंडधारी रावण हत्‍यारी श्रीरामांच्‍या चेतनेने व चापाने पुढील पाच सहस्‍त्र वर्षे तुम्‍ही सर्वांस पुरून उराल !

– स्‍वातंत्र्यवीर सावरकर