‘गोव्याच्या मडगाव ते कोलवा मार्गावरील मुंगुल-मडगाव येथील कोमुनिदादच्या मालकीच्या भूमीवरील३१ अनधिकृत बांधकामे १२ फेब्रुवारी २०२५ या दिवशी पोलीस बंदोबस्तात भूईसपाट करण्यात आली. या वेळी मामलेदार आणि कोमुनिदाद प्रशासनाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. ही भूमी सखल भागात असल्याने त्या ठिकाणी मातीचा भराव टाकून काहींनी बांधकामे केली होती. याची नोंद घेऊन १२ वर्षांपूर्वी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. न्यायालयाने वर्ष २०१७ मध्ये यावर कारवाई करण्याचा निवाडा दिला होता.’