देहलीच्या दंगलीवर आधारित चित्रपटाचे प्रकरण

नवी देहली – देहलीतील वर्ष २०२० च्या दंगलीवर आधारित ‘२०२० दिल्ली’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी २ याचिका देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या आहेत. दोन्ही प्रकरणांची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना नोटीस बजावली. आता या प्रकरणाची सुनावणी ३१ जानेवारीला होणार आहे.
🚨 Sharjeel Imam an accused in the Delhi Riots case files petition to halt the release of ‘2020 Delhi’ film
🎥 The film ‘2020 Delhi’ is set to expose who instigated the Delhi riots and who attacked Hindus.
This is precisely why radical fanatics are making desperate attempts to… pic.twitter.com/IgjBU58Gpj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 1, 2025
१. या दोन्ही याचिकांपैकी एक याचिका या दंगलीतील आरोपी शरजील इमाम याने प्रविष्ट केली आहे. चित्रपटाचे कथानक पक्षपाती असल्याचा आरोप त्याने केला आहे. चित्रपट निर्मात्यांनी कायदेशीर प्रक्रियांकडे दुर्लक्ष केले आणि दंगलीच्या घटना जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने सादर केल्या. आम्हाला आतंकवादी दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या त्याच्या जामीन अर्जावर परिणाम होऊ शकतो. खटला पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचा ट्रेलर (विज्ञापन), छायाचित्र, भित्तीपत्रक, टीझर (छोटे विज्ञापन) व्हिडिओ आदी काढून टाकण्यात यावे, अशी मागणी त्याने केली आहे.
२. या दंगलीतील आरोपी आणि पीडित यांनी दाखल केलेल्या आणखी एका याचिकेत त्यांनी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने दिलेले चित्रपट प्रमाणपत्र रहित करण्याची आणि चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकादेहलीतील दंगल कुणी चालू केली आणि हिंदूंवर कुणी आक्रमण केले, हे या चित्रपटातून उघड होणार असल्यानेच त्याच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याचा आटापिटा धर्मांध मुसलमान करत आहेत. सरकारने अशांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे ! |