देवाची ओढ असलेली घाटकोपर, मुंबई येथील चि. हिंदवी सागर हराळे (वय १ वर्ष) !

फाल्गुन शुक्ल द्वादशी (११.३.२०२५) या दिवशी चि. हिंदवी सागर हराळे हिचा तिथीनुसार प्रथम वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. हिंदवी हराळे

१. जन्मापूर्वी

अ. ‘मी गरोदरपणात नियमित स्तोत्र, हनुमान चालीसा आणि शिव तांडव म्हणत होते, तसेच मी गीतेचे वाचन करत असे अन् नामजप करत असे.

२. जन्म ते २ मास

अ. बालिकेचा जन्म झाल्यापासून तिच्या शरिरावर दैवी कण आढळत असत.

आ. मी हिंदवीला ॐ चा उच्चार करून दाखवल्यावर तीही ॐ म्हणण्याचा प्रयत्न करत असे.

इ. ती २ मासांची असतांना आमच्या घरी आलेल्या साधकांना तिने हात जोडून नमस्कार केला.’

– सौ. साक्षी हराळे (चि. हिंदवीची आई), घाटकोपर, मुंबई.

३. वय ३ ते ५ मास 

अ. ‘मी हिंदवीला ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगितल्यावर ती तिचा हात उंचावत असे.

आ. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी तिच्यासाठी ‘महाशून्य’ हा नामजप करायला सांगितला होता. तेव्हा मी नामजप करत असतांना ‘तीही नामजप करत आहे’, असे मला जाणवत असे.

इ. मी तिच्या हातात श्रीकृष्णाचे चित्र दिल्यावर ती ते चित्र कपाळाला लावून नमस्कार करत असे.

ई. तिच्या हातात देवतेचे चित्र असलेले सनातनचे पदक दिल्यावर ती ते स्वतःच गळ्यात घालते.

उ. ‘तिच्याकडे सतत पहात रहावे’, असे मला वाटते. समाजातील व्यक्तीही तिच्याकडे आकर्षित होतात.’

– सौ. पुष्पा हराळे (चि. हिंदवीची आजी), घाटकोपर, मुंबई.

४. वय ६ ते ९ मास

अ. ‘मी देवपूजा करत असतांना हिंदवी माझ्याजवळ येऊन घंटी वाजवत असे.

आ. तिला ‘देवबाप्पा कुठे आहे ?’, असे विचारल्यावर ती देवघराकडे पहाते आणि हात जोडते.’

– श्री. सखाराम हराळे (चि. हिंदवीचे आजोबा), घाटकोपर, मुंबई.

५. वय ९ मास ते १ वर्ष 

अ. ‘मी हिंदवीला मंदिरात नेल्यास ती माझ्या मांडीवर शांतपणे बसते आणि हात जोडून नामजप करते.

आ. ती मंदिरातील शंकराच्या पिंडीवर वाहिलेली फुले स्वतःच्या कपाळाला लावते.

इ. मंदिरात ध्वनीक्षेपकावर ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप लावलेला असतांना ती टाळ्या वाजवते.’

– श्री. सागर हराळे (चि. हिंदवीचे वडील), घाटकोपर, मुंबई.

(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : ७.२.२०२५)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.