Prayagraj Kumbh Parva 2025 : ‘श्रवण कुंभ’ या उत्तरप्रदेशाचे राज्यमंत्री संजीव कुमार गोंड यांच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीला निमंत्रण !

प्रयागराज, २८ जानेवारी (वार्ता.) : उत्तरप्रदेश सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून आयोजित ‘श्रवण कुंभा’च्या कार्यक्रमात समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री संजीव कुमार गोंड मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

संजीव कुमार गोंड (डावीकडे) यांना माहितीपत्रक देतांना श्री. राजन केसरी

या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीला विषय मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. समितीचे श्री. राजन केसरी यांनी समितीच्या कार्याची माहिती देण्यासह समितीच्या प्रदर्शनकक्षाला येण्यासाठी उपस्थितांना आमंत्रित केले.

या वेळी श्री. केसरी यांनी राज्यमंत्री संजीव कुमार गोंड यांना समितीचे माहितीपत्रक देऊन समितीच्या राष्ट्र आणि धर्मविषयक कार्याशी अवगत केले. ऐकू येण्याची अडचण असणार्‍या रुग्णांची ‘श्रवण कुंभा’मध्ये पडताळणी करून ६० वर्षांवरील रुग्णांना विनामूल्य कर्णयंत्र दिले जात आहे.