|
मुंबई – गोरेगावमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात सिझेरियन ब्लेड आणि दगड भरले. या प्रकरणी रिक्शाचालक राजरतन सदाशिव वायवळ (वय ३२ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी गोरेगावमधील राममंदिर रेल्वेस्थानकाच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत आढळली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. आधुनिक वैद्यांनी तरुणीच्या गुप्तांगातून सिझेरियन ब्लेड आणि काही दगड बाहेर काढले.
वृद्धेवर २० वर्षीय तरुणाकडून बलात्कार !
गोरेगावमधील दिंडोशी भागात ७५ वर्षीय महिलेवर २० वर्षीय तरुणाने बलात्कार केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. (वृद्धांचा आदर करणे तर दूरच; पण त्यांच्याकडे वासनांधतेने पाहून त्याप्रमाणे कृती करणारी तरुण पिढी असणे हे देशाचे दुर्दैव ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|