Karnataka DSP Arrested : स्वतःच्या कक्षात महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या पोलीस उपअधीक्षकाला अटक

तुमकुरू (कर्नाटक) येथील घटना

पोलीस उपअधीक्षक बी. रामचंद्रप्पा

तुमकुरू (कर्नाटक) – येथील पोलीस उपअधीक्षक बी. रामचंद्रप्पा (वय ५८ वर्षे) याला एका ३० वर्षीय महिलेचे स्वतःच्या कक्षातील प्रसाधनगृहात लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेचा व्हिडिओ २ जानेवारी या दिवशी सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पीडित महिला घटनेच्या दिवशी भूमीच्या वादाची तक्रार करण्यासाठी उपअधीक्षक रामचंद्रप्पा याच्याकडे गेली होती. त्यानंतर रामचंद्रप्पा याने महिलेकडे साहाय्याच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केली होती.

संपादकीय भूमिका

रक्षक नव्हे भक्षक ! अशांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे !