दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे आयुर्वेद महोत्सव सर्वांपर्यंत पोचण्यास साहाय्य ! – प्रदीप भिडे आणि श्री. शशिकांत कुलकर्णी, आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन, कोल्हापूर

‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’च्या वतीने २७ ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘आयुर्वेद महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवास अन्य प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करण्यात विशेष रस दाखवला नाही; मात्र या महोत्सवात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी चांगल्या प्रकारे वार्तांकन केले. या वार्तांकनामुळे आयुर्वेद महोत्सव सर्वांपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले. येथे झालेली विविध व्याख्याने, स्टॉल्स, चर्चासत्रे यांच्या वृत्तांतामुळे आयुर्वेद घरोघरी पोचला. याच कालावधीत आमचे अध्यक्ष श्री. शेखर खोले यांची ‘डिजिटल’ मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे राज्यात सर्वत्र आमचे अधिवेशन पोचले. पंचमहाभूत लोकोत्सवाच्या प्रसंगी काढण्यात आलेल्या यात्रेत आमचे ‘असोसिएशन’ सहभागी होते. याचाही यथायोग्य उल्लेख ‘सनातन प्रभात’मध्ये होता. आयुर्वेदाच्या प्रचारासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ची धडपड उल्लेखनीय आहे.