हिंदु धर्मातील संस्कृती, परंपरा यांविषयी ‘सनातन प्रभात’मधून माहिती दिली जाते. हिंदूंच्या उत्सवात काही अपप्रकार शिरले आहेत. त्याला दुरुस्त करण्यासाठी ‘सनातन प्रभात’ची धडपड कौतुकास्पद आहे. इस्लामी आतंकवाद, ‘लव्ह जिहाद’ अशा संकटांच्या संदर्भात सातत्याने वृत्त देऊन हिंदूंना जागे ठेवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करते. गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणांविषयी माहिती देऊन, त्या संदर्भातील लढा देणार्यांनाही प्रेरणा देते. सर्व हिंदुत्वनिष्ठांना आपले वाटणारे, देव, देश, धर्म टिकवण्यासाठी निर्भिडपणे आवाज उठवणारे एकमेव दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय !