India Slams Pakistan In UN : पाकच्या खोटे बोलण्याने जम्मू-काश्मीरच्या संदर्भातील वस्तूस्थिती पालटणार नाही !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला फटकारले !

संयुक्त राष्ट्रांत भारताचे प्रतिनिधी सुधांशू त्रिवेदी

न्यूयॉर्क (अमेरिका) –जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. जम्मू-काश्मीरच्या जनतेने अलीकडेच लोकशाही आणि निवडणूक अधिकारांचा वापर करून नवीन सरकार निवडले आहे. त्यामुळे पाकने जम्मू-काश्मीरच्या संदर्भात खोट्या बातम्या पसरवू नये; कारण त्यामुळे वस्तूस्थिती पालटणार नाही, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांत भारताचे प्रतिनिधी सुधांशु त्रिवेदी यांनी पाकला फटकारले.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या विशेष राजकीय आणि वसाहतीकरण समितीच्या बैठकीत पाककडून विधान करण्यात आले होते. पाकिस्तानने भारतातील संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकी निरीक्षक गटाचा संदर्भ दिला.

संपादकीय भूमिका

भारताने संयुक्त राष्ट्रांत जम्मू-काश्मीरवरून पाकला अनेकदा फटकारले असले, तरी त्याच्यात कोणताही पालट होत नाही; कारण तो ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, याच वृत्तीचा आहे. त्याला शब्दांचा नाही, तर शस्त्रांचा मारच कळतो आणि तो देण्याचे धाडस भारताने दाखवणे आवश्यक आहे !