Burhanpur Train Derail Attempt : साबीर नावाच्या रेल्वे कर्मचार्‍याला अटक !

  • बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील रेल्वे रुळावर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण

  • या रेल्वे रुळावरून जाणार होती भारतीय सैनिकांसाठीची विशेष गाडी

बुरहानपूर (मध्यप्रदेश) – येथे १८ सप्टेंबरला रेल्वे रुळावर स्फोटांसाठी वापरण्यात येणारे डिटोनेटर्स सापडले होते. भारतीय सैनिक आणि अधिकारी ज्या रेल्वे गाडीतून प्रवास करणार होते, ती गाडी रेल्वे रुळावरून घसरवून तिचा अपघात घडवून आणण्यासाठी हे डिटोनेटर्स येथे ठेवण्यात आल्याचा संशय होता. आता या प्रकरणी पोलिसांनी साबीर नावाच्या आरोपीला अटक केली आहे. साबीर रेल्वेचा कर्मचारी आहे. या कृत्यामागील त्याचा हेतू तपासला जात आहे. (हेतू काहीही जरी असला, तरी अशा प्रकारे स्फोटके ठेवणे, हे कायद्यात बसते का ? – संपादक)

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, आतंकवादविरोधी पथक आणि रेल्वे पोलीस दल यांच्याकडून साबीरची चौकशी करण्यात येत आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले की, जप्त केलेले डिटोनेटर केवळ रेल्वे खात्यामध्ये वापरले जातात; परंतु ते जिथे सापडले, तिथे ते नेण्याचे काहीही कारण नव्हते.

धुके किंवा धुक्यात रेल्वे थांबवण्यासाठी डिटोनेटरचा वापर केला जातो. त्यांचा स्फोट घडवल्यावर रेल्वे चालक सतर्क होऊन गाडी थांबवू शकतो. हे डिटोनेटर्स स्थानक प्रमुख, ‘की मॅन’ आणि ‘लोको पायलट’ यांच्याकडे असतात.

संपादकीय भूमिका

‘रेल्वे जिहादी’ देशासाठी किती घातक आहेत, हे लक्षात घ्या !