MP Schools Janmashtami Celebration : सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी साजरी करण्‍याचा आदेश

मध्‍यप्रदेशातील भाजप सरकारचा आदेश

मध्यप्रदेशचे मुख्‍यमंत्री मोहन यादव

भोपाळ (मध्‍यप्रदेश) – मध्‍यप्रदेशातील भाजप सरकारने राज्‍यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथेे श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी साजरी करण्‍याचा आदेश दिला आहे.  सरकारने सर्व विभागीय आयुक्‍त आणि जिल्‍हाधिकारी यांना आदेश प्रसारित करून सांगितले की, २६ ऑगस्‍टला श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमीच्‍या निमित्ताने प्रत्‍येक जिल्‍ह्यात असलेल्‍या श्रीकृष्‍ण मंदिरांची स्‍वच्‍छता करण्‍यात यावी आणि तेथे सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात यावे. याखेरीज सर्व शासकीय-निमशासकीय शाळा-महाविद्यालयांमध्‍ये श्रीकृष्‍णाने घेतलेलेे शिक्षण, मैत्री आणि त्‍याने सांगितलेले जीवनाचे तत्त्वज्ञान यांवर सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात यावे.

(म्‍हणे) ‘शिक्षणाचे धर्मांतर’ होत आहे ! – काँग्रेस

सरकारच्‍या या आदेशाला काँग्रेसने ‘शिक्षणाचे धर्मांतर’ असे म्‍हटले आहे. (शिक्षणाचे धर्मांतर नाही, तर ‘घरवापसी’ होत आहे. काँग्रेसने शिक्षणाचे ‘हिरवेकरण’ केले होते, ते पालटून नीट केले जात आहे ! – संपादक) ‘शैक्षणिक संस्‍था हे शिक्षणाचे केंद्र असून ते केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित असले पाहिजे’, असे काँग्रेसने म्‍हटले आहे. काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद म्‍हणाले की, राज्‍य सरकार शैक्षणिक संस्‍था नष्‍ट करण्‍यात का गुंतले आहे, हे समजत नाही. धार्मिक कार्यक्रमांच्‍या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी असते आणि सर्व धर्माचे लोक आपापल्‍या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. एकीकडे तुम्‍ही शैक्षणिक संस्‍थांमध्‍ये जन्‍माष्‍टमी अनिवार्य म्‍हणता आणि दुसरीकडे आमच्‍या मदरशांवर प्रश्‍न उपस्‍थित करता. (श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी साजरी केल्‍याने मुले आदर्श नागरिक आणि नीतीवान बनतील. मदरशांतून शिक्षण घेणारे आतंकवादी बनतात, असेच बहुतेक वेळा आढळून आले आहे. इतकेच नव्‍हे, तर अशा मदरशांमध्‍ये मुली आणि मुले यांच्‍यावर तेथील शिक्षक लैंगिक अत्‍याचार करतात, हे नेहमीच उघड होत असते ! – संपादक) तुम्‍हाला नेमके काय हवे आहे ?, असा प्रश्‍न त्‍यांनी विचारला.

जन्‍माष्‍टमी मोठ्या थाटामाटात साजरी केल्‍यास काँग्रेसचे लोक मथुरेत जाणे बंद करतील का ? – मुख्‍यमंत्री मोहन यादव

राज्‍याचे मुख्‍यमंत्री मोहन यादव यांनी काँग्रेसला प्रत्‍युत्तर देतांना सांगितले की, भगवान श्रीकृष्‍णाने ५ सहस्र वर्षांपूर्वी शिक्षणाचे महत्त्व सांगितले होते. भगवान श्रीकृष्‍ण मथुरेहून उज्‍जैनला शिक्षण घेण्‍यासाठी आले. श्रीमंत आणि गरीब यांच्‍यातील मैत्रीचे सर्वांत मोठे उदाहरण म्‍हणजे नारायण धाम येथील श्रीकृष्‍ण आणि सुदामा यांच्‍यातील मैत्री. भगवान श्रीकृष्‍णाच्‍या शौर्याचे प्रतीक असलेले स्‍थान अधोरेखित करण्‍यात अयोग्‍य काय आहे ?

जन्‍माष्‍टमीला श्रीकृष्‍णाची स्‍थळे आठवत नाहीत, तर मथुरेची आठवण का येते ? मथुरेत जन्‍माष्‍टमी मोठ्या थाटामाटात साजरी केल्‍यास काँग्रेसचे लोक मथुरेत जाणे बंद करतील का ? हा अनादर आहे.

संपादकीय भूमिका

भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्‍येक राज्‍यांनी असा निर्णय घेण्‍यापेक्षा केंद्र सरकारने हिंदूंचे सण साजरे करण्‍याचा आदेश संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !