
सातारा, २१ मार्च (वार्ता.) – येथील गोडोलीमध्ये श्री भैरवनाथ मंदिर आहे. या मंदिर परिसरामध्ये यात्रेनिमित्त पशूहत्येस बंदी करण्याचा निर्णय यात्रा समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. गोडोली गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार पशूबळी देण्याची प्रथा होती; मात्र धार्मिक परिवर्तन करत यात्रा समितीने पशूबळी प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे समाजातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (मंदिरातील पशूबळीची शेकडो वर्षांची प्रथा बंद करतांना धर्माचार्यांचे मत यात्रा समितीने घेतले होते का ? – संपादक)