शिकागो – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या(democratic party) उमेदवाराच्या अधिकृत घोषणेसाठी आयोजित ‘डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन’च्या (डी.एन्.सी.च्या) तिसर्या दिवशीचे कामकाज प्रथमच वैदिक मंत्रोच्चाराने चालू झाले. भारतीय-अमेरिकन पुजारी राकेश भट्ट(Rakesh Bhatt) यांनी तिसर्या दिवशीच्या कामकाजाला मत्रोच्चराने प्रारंभ केला. डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस(Kamala harris) राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षाचे आर्थिक व्यवहार विभागाचे उपप्रमुख अजय भुटोरिया म्हणाले की, राकेश भट्ट यांनी ‘डी.एन्.सी.’मध्ये वैदिक पद्धतीने प्रार्थना करणे हा एक महत्त्वाचा क्षण आहे. ही कृती डेमोक्रॅटिक पक्षाची सर्वसमावेशकता आणि विविधता यांविषयीची वचनबद्धता दर्शवते. ‘हा क्षण भारतीय अमेरिकन समुदायाचा वाढता प्रभाव प्रतिबिंबित करतो’, असेही भुटोरिया म्हणाले.
संपादकीय भूमिका
|