|
पुणे – पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी साडी नेसण्यावरून केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद जगताप यांनी, तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कसबा पेठेतील फडके हौद चौकामध्ये आंदोलन केले. या वेळी त्यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्याची मागणीही केली.
पुणे येथील डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावर ‘मस्त ग्रुप’ आणि ‘त्रस्त ग्रुप’ यांनी फलकाच्या माध्यमातून पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर टीकात्मक लिखाण केले आहे.
संपादकीय भूमिकाउघडपणे देशद्रोही विधाने करणार्यांवर नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठ प्रमुखांच्या संदर्भात अशी मागणी होणे दुर्दैवी ! हिंदूबहुल महाराष्ट्रात असे होणे अपेक्षितच नाही ! |