भगवान शंकर प्रवर्तक असलेले  योगशास्त्र !

योगशास्त्राचा उगम अनुमाने ५ सहस्र वर्षांपूर्वी भारतात झाला. भगवान शंकर हे योगशास्त्राचे प्रवर्तक मानले जातात. प्राचीन भारतीय धर्मग्रंथांमध्ये वेदांचे विवरण करण्यासाठी ‘दर्शनशास्त्रे’ लिहिली गेली. ‘योग’ हे त्यांपैकीच एक शास्त्र आहे. पतंजलिमुनींनी मानवजातीच्या कल्याणासाठी १९५ योगसूत्रांची सूत्रबद्ध मांडणी केली.