भारत आणि योगशास्त्र !

‘जगाच्या पाठीवर ‘भारत’ हा एकच देश आहे की, त्याच्यावर विविध साम्राज्यवाद्यांनी अनेक आक्रमणे करूनही हिंदु संस्कृती, परंपरा आणि अस्तित्व आजही तितक्याच सामर्थ्याने टिकवून संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करत आहे. याचे खरे रहस्य, म्हणजे ऋषिमुनी आणि साधूसंतांनी या भूमीवर जे आध्यात्मिक सिंचन केले आहे, त्याचे फलस्वरूप आहे. त्यामुळेच आज संपूर्ण विश्वातील सारा समाज भारताकडे मोठ्या आशेने, अपेक्षेने पहात आहे. योग साधनेमुळे आरोग्यसंपन्नता, मानसिक शांतता आणि इंद्रियांवर विजय प्राप्त होऊन मन, बुद्धी, शरीर अन् आचार-विचार यांची क्षमता वाढते. सुख-शांती, प्रसन्नता, आनंद, उत्तम आरोग्य प्राप्ती आणि यशस्वी जीवन वाटचाल प्राप्त होण्यासाठी योगशास्त्र, योगविद्या याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या देशाच्या सांप्रतच्या पंतप्रधानांनी ‘योग’शास्त्राचे महत्त्व ‘संयुक्त राष्ट्रां’मध्ये प्रतिपादन करून १९५ देशांपैकी १७१ देशांनी मान्यता दिलेल्या ‘योग’ दिवसाचे अपूर्वत्व, त्याचे वैशिष्ट्य, त्याची आवश्यकता दर्शवणारे आहे. त्यामुळेच २१ जून या दिवशी जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात येतो.’

(साभार : मासिक ‘संतकृपा’)