योगदिन साजरा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या संकल्पना !

वर्ष २०१५ मध्ये पहिल्यांदा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्यात आला. योगदिन देशात विविध विभाग, संस्था आदींकडून साजरा करण्यात येतो. हा दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी एखादी संकल्पना देण्यात आली आहे. त्या वर्षी ‘सुसंवाद आणि शांततेसाठी योग’ ही संकल्पना वापरण्यात आली.

वर्ष २०१६ मध्ये ‘शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग’, वर्ष २०१७ मध्ये ‘आरोग्यासाठी योग’, वर्ष २०१८ मध्ये ‘शांततेसाठी योग’, वर्ष २०१९ मध्ये ‘हृदयासाठी योग’, वर्ष २०२० मध्ये ‘घरी आणि कुटुंबासह योग’, वर्ष २०२१ मध्ये ‘निरोगीपणासाठी योग’, वर्ष २०२२ मध्ये ‘मानवतेसाठी योग’, वर्ष २०२३ मध्ये ‘वसुधैव कुटुंबकम्साठी योग’ ही योगदिनाची संकल्पना होती. ‘एक विश्व-एक कुटुंब’ म्हणजेच सर्वांच्या कल्याणासाठी योग आहे, हे दर्शविण्यासाठी ही संकल्पना निवडण्यात आली होती. वर्ष २०२४ मध्ये ‘स्वतः आणि समाज’ ही संकल्पना आहे.