‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ध्वजारोहण झाले. गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला ध्वजपूजन पहायला मिळाले.
१. ध्वजपूजनाचे दृश्य अत्यंत आनंददायी होते. आध्यात्मिक चैतन्याची अनुभूती घेतल्यावर माझा भाव जागृत होत होता.
२. ध्वजपूजनाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची उपस्थिती उच्च लोकाची अनुभूती देत होते.
३. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले स्थूल रूपात तेथेच उपस्थित आहेत’, असे मला जाणवले.
४. मला आकाशात तिन्ही गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) विराट रूपात दर्शन झाले.
५. मला आकाशात गरुडदेवाचे दर्शन होत होते. तेव्हा मला वाटत होते, ‘गरुड ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालून एक प्रकारे सूक्ष्म संरक्षककवच निर्माण करत आहे.’
६. साधकांनी जयघोष केल्यावर ‘ते चैतन्यमय स्वर ब्रह्मांड आणि उच्च लोक यांमध्ये दुमदुमत आहेत’, अशी अनुभूती आली.
७. ‘सूर्यदेवाचा अस्त होत असतांना त्याचे पूर्व दिशेला दर्शन होत आहे. आता लवकरच रामराज्य येणार आहे’, असे मला जाणवले.
गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. माधवी प्रमोद शर्मा, लुधियाना, पंजाब. (१०.६.२०२२)
|