‘देवाने आम्हाला जसे सूक्ष्म दृष्टी असणारे साधक दिले, तसे सूक्ष्म-चित्रे काढणारेही साधक दिले. या साधकांत सौ. आरती पुराणिक, कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर) आणि कु. प्रियांका लोटलीकर (आताच्या सौ. प्रियांका सुयश गाडगीळ) या आहेत. सूक्ष्म परीक्षण करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी एक उपायपद्धत शोधून काढली, ती म्हणजे एखाद्या साधकाला त्रास देणार्या वाईट शक्तीचे चित्र कागदावर काढायचे आणि ते चित्र समोर ठेवून त्या चित्राकडे पाहून नामजप करायचा.
(भाग ११)
१. सूक्ष्मातील अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेल्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी वाईट शक्तींची सूक्ष्म-चित्रे काढणे
सद्गुरु अनुराधाताई यांना सूक्ष्मातील पुष्कळ कळते आणि दिसते. त्या त्रास देणार्या मोठ्या वाईट शक्तीचेही सूक्ष्म-चित्र काढू शकतात. त्यांच्यात सूक्ष्म जाणण्याच्या संदर्भातील अनेक गुण एकत्रितपणे आहेत. या दैवी गुणांचा परात्पर गुरु डॉक्टरांनी उपयोग करून घेतला नाही, तरच नवल ! सद्गुरु अनुराधाताई आम्हा साधकांना, तसेच एकूणच समष्टीला त्रास देणार्या मोठ्या वाईट शक्तींची सूक्ष्म चित्रे काढून पाठवायच्या.
२. सद्गुरु अनुराधाताई यांनी काढलेल्या वाईट शक्तीच्या चित्राकडे पाहून नामजप करत असतांना वाईट शक्तीच्या चेहर्यावरील हावभाव पालटणे
आम्ही या चित्राच्या प्रती काढत असू आणि मी, सुश्री (कु.) कविता राठीवडेकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) अन् कु. सुषमा पेडणेकर (आताच्या सौ. सुषमा सुनील नाईक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)) ही चित्रे समोर ठेवून त्यांच्याकडे पाहून अनेक घंटे नामजप करत असू. यातून लक्षात येऊ लागले की, सूक्ष्मातून मोठ्या वाईट शक्तीची शक्ती न्यून होऊ लागली की, चित्रातील तिचा चेहरा रडवेला दिसे, तर कधी वाईट शक्ती चिडून आमच्यावर आक्रमण करत असे. त्या वेळी तिचा चित्रातील चेहरा रागीट दिसे. चित्रातील हे सर्व पालट सूक्ष्मातीलच होते. आम्ही हे वेळोवेळी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगत असू.
३. वाईट शक्तींशी सूक्ष्मातून युद्ध करत असतांना त्यांची लक्षात आलेली चिकाटी आणि साधना करण्याचे जाणवलेले महत्त्व !
त्या वेळी परात्पर गुरुदेव म्हणायचे, ‘‘आता देवाला विचारा, ‘त्या वाईट शक्तीकडे किती टक्के शक्ती राहिली आहे आणि आपले त्याच्या समवेत असलेले सूक्ष्मातील युद्ध कधी थांबवायचे ?’’ असे केल्याने काही ठराविक कालावधीनंतर आम्ही चित्रावर नामजपादी उपाय करणे थांबवत असू. नंतर दुसर्या दिवशी आमच्या लक्षात येत असे की, वाईट शक्तीने परत साधना करून तिची शक्ती वाढवलेली आहे. परत आम्ही देवाला प्रार्थना करून युद्ध चालू करत होतो. असे एकाच चित्रावर १५ दिवस प्रयोग केल्यानंतर त्या वाईट शक्तीची शक्ती न्यून होत असे. यातून आम्ही ‘वाईट शक्तीची युद्ध करण्यातील, तसेच साधना करून शक्ती वाढवण्यातील चिकाटी किती आहे !’, हे शिकलो, तसेच आम्हाला साधना करण्याचे महत्त्वही कळले. वाईट शक्तीही दुसर्यांवर आक्रमण करण्यासाठी साधना करतात. केवळ त्यांचा कार्य करण्याचा उद्देश नकारात्मक असतो, एवढाच काय तो फरक !
४. सद्गुरु अनुराधाताई वाईट शक्तींची सूक्ष्म-चित्रे काढत असल्याने वाईट शक्तींना हरवणे सोपे जाणे आणि त्यामुळे त्यांनी सद्गुरु अनुराधाताई यांच्यावर आक्रमणे करणे
सद्गुरु अनुराधाताई समष्टीला त्रास देणार्या वाईट शक्तींची सूक्ष्म-चित्रे हुबेहूब काढत. ‘वाईट शक्तींचे सूक्ष्म रूप आपल्या हाती लागल्याने त्यांना हरवणे आपल्याला सोपे जाते’, असे परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला सांगत असत; परंतु यामुळे वाईट शक्ती चिडून सद्गुरु अनुराधाताईंवरच आक्रमण करू लागल्या.
५. गुरुदेवांनी ‘युद्धापेक्षा साधक महत्त्वाचे आहे’, असे सांगून सद्गुरु अनुराधाताईंना काही कालावधीसाठी सूक्ष्म-चित्रे काढणे थांबवण्यास सांगणे
सद्गुरु ताईंना ‘प्राणशक्ती न्यून होणे, पुष्कळ ग्लानी येणे, थकवा येणे, डोळे आणि डोके यांवर दाब जाणवणे’, असे असह्य त्रास होऊ लागले. त्या वेळी गुरुदेवांनी सद्गुरु अनुराधाताईंना काही कालावधीसाठी सूक्ष्म-चित्रे काढणे थांबवण्यास सांगितले; कारण गुरुदेव म्हणाले, ‘‘आपला स्थूलदेह साधना करण्यासाठी पुष्कळ महत्त्वाचा आहे. वाईट शक्ती सूक्ष्म असल्याने आणि त्यांना स्थूलदेह नसल्याने त्या आपल्यापेक्षाही अधिक शक्तीशाली आहेत. कधी कधी सूक्ष्म युद्धात जीव जाण्याचीही शक्यता असते. आपल्याला युद्धापेक्षा साधक महत्त्वाचा आहे.’’ असा दृष्टीकोन शिकवून परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनचा प्रत्येक साधक अमूल्य असण्याचे महत्त्व आमच्या मनावर बिंबवले. ‘त्या साधकाची काळजी आपण घेतलीच पाहिजे’, हेही त्यांनी आम्हाला दाखवून दिले आणि म्हणून आम्ही युद्ध थांबवले.
६. अनेक जन्म वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून साधकांचे प्राणरक्षण करणारे परात्पर गुरुदेव !
आम्ही प्रत्यक्ष युद्ध थांबवले, तरी वाईट शक्ती सूक्ष्मातून आक्रमण करतच आहेत आणि त्यांपासून गुरुदेव आमचे रक्षण करतच आहेत, म्हणजेच ‘सूक्ष्मातून अप्रत्यक्षपणे गुरुदेव करत असलेले कार्य किती मोठे आहे !’, हेही आम्हाला या उदाहरणातून शिकायला मिळाले. ‘आमच्यासारख्या क्षुद्र जिवांना गुरुदेव किती जन्म सांभाळत आहेत !’, हेही आमच्या आकलनक्षमतेच्या पलीकडे आहे. त्यांच्यामुळेच आम्ही जिवंत आहोत, नाहीतर या मोठ्या वाईट शक्तींना आम्हाला जिवे मारायला कितीसा वेळ लागणार ?
अशा प्रकारे ‘प्राणरक्षण करून गुरुदेवांनी आम्हाला किती वेळा ‘बोनस’ (अतिरिक्त) आयुष्य दिले आहे ?’, हे सांगता येणे अशक्य आहे. यातून ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक साधकाची जन्मोजन्मी किती काळजी घेत आहेत !’, हे आम्हाला शिकायला मिळाले. धन्य ते आमचे प्राणरक्षणकर्ते गुरुदेव आणि धन्य त्यांच्या छत्रछायेत असणारे साधक !’ (क्रमशः)
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (८.२.२०२२)
|