महिला न्यायाधिशांना पी.एफ्.आय.च्या जिहाद्यांकडून धमक्या ! (PFI Threats Woman Judge)

हिंदुत्वनिष्ठाच्या हत्येच्या प्रकरणात पी.एफ्.आय.च्या जिहाद्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याचे प्रकरण

भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास आणि त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी

थिरूवनंतपूरम् : केरळमधील भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास यांची १९ डिसेंबर २०२१ या दिवशी अलाप्पुझा येथील त्यांच्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणातील १५ आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ते बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पी.एफ्.आय.चे) सदस्य होते. या प्रकरणी शिक्षा सुनावणार्‍या न्यायाधीश व्ही.जी. श्रीदेवी जिहाद्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यांना सामाजिक माध्यमांतून धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच २ जणांना कह्यात घेण्यात आले आहे.

१. पी.एफ्.आय.शी संबंधित धर्मांधांनी सामाजिक माध्यमांवरून न्यायाधीश श्रीदेवी यांच्या विरोधात मोहीम राबवली आहे. त्यांचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आले आहे. न्यायाधीश श्रीदेवी या केरळच्या अलाप्पुझा येथील मावेलिक्कारा न्यायालयात  न्यायाधीश आहेत.

२. केरळ पोलिसांनी न्यायाधीश श्रीदेवी यांना धमकावल्याच्या प्रकरणी किमान ६ गुन्हे नोंदवले आहेत. बी.वी. केयू, अस्लम वलप्पुचा, नजीर मोन खलील, आझाद अमीर, रफी थिरूवनंतपूरम् आणि शफीक अशी गुन्हा नोंदवलेल्या जिहाद्यांची नावे आहेत.

३. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना थिरूवनंतपूरम् आणि अल्लापुझा येथून अटक केली आहे.

(सौजन्य : India Today)

संपादकीय भूमिका

  • पी.एफ्.आय.वर बंदी घालण्यात आली आहे. असे असले, तरी त्याचे समर्थक आणि जिहादी कृत्ये करणारे अजूनही कार्यरत आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. या संघटनेची पाळेमुळे खणून काढण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !
  • केरळमध्ये धर्मांधांचे लांगूलचालन करणारे साम्यवादी सरकार सत्तेत असल्यामुळे न्यायाधिशांना धमकावण्याचे दुःसाहस धर्मांध करतात !