मध्यप्रदेशात भोंग्यांवर बंदी !

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा पहिला निर्णय !

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशात भोंग्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मुख्यमंत्री होताच हा पहिला मोठा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी भोंगे वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ देण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले डॉ. मोहन यादव अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात, तर अनेक वर्षे मुख्यमंत्री पदावर असणारे आतापर्यंत का घेऊ शकले नाहीत ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !
  • मुख्यमंत्र्यांकडे इच्छाशक्ती असेल, तर तेे त्यांच्या अधिकार कक्षेत कठोर निर्णय घेऊ शकतो, हेच यातून स्पष्ट होते !