श्रीक्षेत्र चाफळ (सातारा) येथील श्रीराम मंदिरात सुनील घनवट यांनी घेतले दर्शन !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट (डावीकडून दुसरे) यांचा सत्कार करतांना ‘श्रीराम मंदिर ट्रस्ट चाफळ’चे व्यवस्थापक श्री. बा.मा. सुतार, श्री. हेमंत सोनावणे आणि सौ. रूपा महाडिक

सातारा, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – श्रीक्षेत्र चाफळ येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दर्शन घेतले. या वेळी मंदिर व्यवस्थापक श्री. बा.मा. सुतार यांनी घनवट यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक उपस्थित होत्या.

या वेळी श्री. सुनील घनवट यांनी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने २ आणि ३ डिसेंबर या दिवशी पुणे जिल्ह्यातील ओझर येथे होणार्‍या परिषदेचे निमंत्रण दिले, तसेच समितीच्या वतीने मंदिर रक्षणाविषयी राबवण्यात आलेल्या विविध अभियानांचीही माहिती दिली. त्यानंतर मंदिर व्यवस्थापक श्री. सुतार यांनी मंदिर परिषदेला उपस्थित रहाण्याचे आश्वासन दिले.