श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या अत्‍युच्‍च भावामुळे त्‍या सेवा करत असलेल्‍या खोलीत घडलेले दैवी पालट आणि त्‍या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती !

१. ‘खोली म्‍हणजे साक्षात् गुरूंचे मंदिर आहे’, असा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा भाव असणे

कु. मयुरी डगवार

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या ज्‍या खोलीत सेवा करतात, त्‍या खोलीविषयी सांगत असतांना त्‍या आम्‍हाला म्‍हणाल्‍या, ‘‘ही खोली नसून साक्षात् गुरूंचे मंदिर आहे.’’ त्‍यांनी हे सांगितल्‍यावर खोलीत असलेल्‍या आम्‍हा सर्वांचा भाव जागृत झाला.

२. खोलीच्‍या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती 

२ अ. खोलीत गुरुतत्त्वाचा प्रवाह जाणवणे : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या उच्‍च प्रतीच्‍या भक्‍तीमुळे त्‍यांच्‍या खोलीत गुरुतत्त्वाचा प्रवाह जाणवतो. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ खोलीत असतांना गुरुतत्त्वाचा हा प्रवाह सगुण आणि निर्गुण अशा दोन्‍ही स्‍तरांवर जाणवतो अन् श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ खोलीत नसतांना हा प्रवाह निर्गुण स्‍तरावर जाणवतो.

२ आ. खोलीच्‍या बाहेरून खोलीचे दर्शन घेत असतांना मन निर्विचार होते, तसेच माझ्‍या मनातील नकारात्‍मक विचार नष्‍ट होतात आणि सकारात्‍मकता येते.

२ इ. खोलीच्‍या जवळ गेल्‍यावर मला सेवेच्‍या संदर्भातील सूत्रे सुचतात.

२ ई. खोलीच्‍या आत गेल्‍यावर ‘मी एका प्रकाशमान पोकळीत प्रवेश करत आहे’, असे मला जाणवते. हे मला प्रत्‍येक वेळी अनुभवायला मिळते.

२ उ. खोलीतील लादीचा स्‍पर्श मऊ जाणवतो. ‘खोलीतील लादी श्‍वास घेत आहे’, असे मला जाणवते.

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ सेवा करत असलेल्‍या खोलीविषयीचे प्रयोग श्री गुरूंनी माझ्‍याकडून करून घेतले आणि मला विविध अनुभूती दिल्‍या’, याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते’

– कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०२२)

कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणार्‍या अहंशून्‍य श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंंगबाळ  !

याविषयी मी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितले. तेव्‍हा त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘इतरांनाही असाच अनुभव येतो आणि हे सर्व परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या संकल्‍पानेच होते.’’

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंंगबाळ यांच्‍या खोलीविषयी साधकाला जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे

श्री. निमिष त्रिभुवन म्हात्रे

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या खोलीच्‍या दारापाशी उभे राहिल्‍यावर माझी भावजागृती होते.

२. त्‍यांच्‍या खोलीत प्रवेश केल्‍यावर माझे मन भरून आल्‍यासारखे होते. मला छातीत आल्‍हाददायक स्‍पंदने जाणवू लागतात आणि त्‍यामध्‍ये मन गुंग होते.

३. त्‍यांच्‍या खोलीत गेल्‍यावर माझा श्‍वास एकदम मोकळा होतो.

४. एकदा मी त्‍यांच्‍या खोलीपासून साधारण १० फूट अंतरावर खोलीच्‍या दाराकडे तोंड करून उभा राहिलो आणि दीर्घ श्‍वास घेतला. तेव्‍हा ‘श्‍वासावाटे माझ्‍या शरिरात बर्‍याच प्रमाणात ऊर्जा प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.

– श्री. निमिष म्‍हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक