नाचत, गाणे गात दोन्ही राष्ट्रध्वज प्रेक्षकांमध्ये फेकून दिले !
पुणे – कोरेगाव पार्क येथील ‘फ्रिक सुपर क्लब’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘प्री इंडिपेंडन्स डे’ या संगीतमय कार्यक्रमामध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या क्लबमध्ये ‘प्री इंडिपेंडन्स डे’ हा कार्यक्रम ‘शांती पीपल’ या म्युझिकल ब्रँडकडून आयोजित करण्यात आला होता. या संगीतमय कार्यक्रमाच्या वेळी उमा शांती या कलाकाराने गाणे सादर केले. त्याने दोन्ही हातांमध्ये ‘राष्ट्रध्वज’ घेतले होते. उमा शांती यांनी नाचत, गाणे गात असतांनाच हातातील दोन्ही राष्ट्रध्वज प्रेक्षकांमध्ये फेकून दिले. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी अधिवक्ता आशुतोेष भोसले यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
स्वतंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील फ्रिक सुपर क्लब येथे घडला आहे
.
.
.#rashtrasanchar #pune #15august #independenceday #india #indianflag #viralvideos #crime pic.twitter.com/6Zi0qkzkxd— Rashtrasanchar (@sanchar_rashtra) August 14, 2023
वरील व्हिडीओ हा केवळ विडंबन लक्षात यावे या दृष्टीने इथे दिला असून असून राष्ट्रध्वजाचा अवमान करणे असा उद्धेश अजिबात नाही.
क्रांतीकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलीदान दिले. त्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आहे ! तो राष्ट्रध्वज प्रेक्षकांमध्ये फेकल्यावरही प्रेक्षक शांत बसतात, इतके आपले मन राष्ट्रध्वजाविषयी असंवेदनशील कसे होते ? राष्ट्रध्वजाची अशी विटंबना आणि अवमान हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी ! |
संपादकीय भूमिका :राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्या कलाकारांच्या कार्यक्रमांवर कायमस्वरूपी बहिष्कार घालायला हवा ! |