वर्ष २०२२ मधील ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या वेळी जाणवलेली सूत्रे आणि हिंदुत्‍वनिष्‍ठांमध्‍ये जाणवलेले पालट

‘वर्ष २०२२ मध्‍ये रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन पार पडले. त्‍या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि हिंदुत्‍वनिष्‍ठांमध्‍ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

सुश्री (कु.) रश्‍मि परमेश्‍वरन्

१. अधिवेशनाला येण्‍यापूर्वी असलेली मनाची स्‍थिती

अधिवेशनासाठी गोवा येथे येण्‍यापूर्वी मला निरुत्‍साह होता. माझ्‍या मनाची स्‍थिती नकारात्‍मक होती. माझे मन आणि बुद्धी यांवर रज-तमाचे आवरण आले होते. एरव्‍ही मी रामनाथी आश्रमात आल्‍यावर काही दिवसांनी माझ्‍यावरील आवरण नष्‍ट होऊन सकारात्‍मक स्‍थिती अनुभवायला येत असे.

२. अधिवेशनाला उपस्‍थित राहिल्‍यावर स्‍वतःत जाणवलेला पालट

अ. या वर्षी अधिवेशनाच्‍या पहिल्‍या दिवसापासूनच मला उत्‍साह जाणवत होता.

आ. मला अन्‍य साधक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांच्‍याशी जवळीक साधता आली.

इ. माझ्‍यावरील आवरण न्‍यून होऊन मला अधिवेशनात सांगितल्‍या जाणार्‍या सूत्रांचे आकलन होत होते.

३. हिंदुत्‍वनिष्‍ठांचा अधिवेशनात कृतीशील सहभाग

अ. अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठांमध्‍येे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रती भाव असल्‍यामुळे ते गुरुदेवांना प्रार्थना करून भाषण चालू करत असत.

आ. हिंदुत्‍वनिष्‍ठांनी धर्मरक्षणार्थ केलेल्‍या कृती आणि त्‍यांना आलेले अनुभव यांविषयी सांगितले.

४. हिंदुत्‍वनिष्‍ठांचे मनोगत

अधिवेशन काळात माझे काही हिंदुत्‍वनिष्‍ठांशी अनौपचारिक बोलणे झाले. तेव्‍हा त्‍यांनी सांगितले,

अ. ‘‘अधिवेशनात केवळ बौद्धिक स्‍तरावर चर्चा होत नाही, तर ‘कोणती कृती करायची ?’, याविषयी स्‍पष्‍ट दिशादर्शन केले जाते.

आ. येथे केलेल्‍या दिशादर्शनानुसार आम्‍ही यापुढे हिंदुत्‍वाचे कार्य करू.’’

५. अधिवेशनाची फलनिष्‍पत्ती

अ. हिंदुत्‍वनिष्‍ठ येथे प्रत्‍येक वर्षी भेटत असल्‍यामुळे त्‍यांच्‍यात जवळीक झाली आहे.

आ. ‘उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्‍चिम हे भारताचे भाग (तेथील हिंदु) एकत्रित आले आहेत’, असे दृश्‍य येथे बघायला मिळालेे.

इ. ‘हिंदूंची एकजूट होऊ शकत नाही’, असे म्‍हणतात; पण ‘निरपेक्ष प्रेम आणि धर्म यांच्‍या आधारावर हिंदु एक होऊ शकतात’, असे अधिवेशनात लक्षात आलेे.

६. अधिवेशनातील सर्व कार्यक्रम चैतन्‍याच्‍या स्‍तरावर झाले.’

– सुश्री (कु.) रश्‍मि परमेश्‍वरन् (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ४६ वर्षे), केरळ (२९.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक