‘२२.४.२०२२ या दिवशी मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांनी वास्तव्य केलेल्या खोलीत बसून नामजप करत होते. तेव्हा माझे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी सूक्ष्मातून झालेले संभाषण पुढे दिले आहे.
मी : बाबा (परात्पर गुरु पांडे महाराज), आम्हाला तुमची आठवण का येत नाही ? तुम्हाला कधी प्रार्थना केली, तर तुम्ही दिसत का नाही ? तुम्हाला प्रार्थना करतांना आमच्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच प्रार्थना होते. असे का ?
(त्या वेळी ‘परात्पर गुरु पांडे महाराज सत्यलोकात आहेत’, असे मला त्यांच्या आध्यात्मिक स्थितीवरून वाटले आणि ‘तशा आशयाचे उत्तर ऐकायला मिळेल’, असेही वाटले.)
परात्पर गुरु पांडे महाराज : मी गुरुतत्त्वात विलीन झालो आहे. त्यामुळे तुम्हाला माझे वेगळे अस्तित्व जाणवणार नाही. तुम्ही जेव्हा माझे स्मरण करता, तेव्हा गुरुतत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून तुमच्या साहाय्याला येते. ‘माझे स्मरण होते’, या तुमच्या भावना आहेत.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या कृपेनेच मी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी सूक्ष्मातून संवाद साधू शकले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी
कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.५.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |