यज्ञाचा प्रथमावतार असलेल्या‘अग्निहोत्रा’चे वैज्ञानिक संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘त्रिकालज्ञानी संतांनी सांगितलेलेच आहे की, आता पुढे भीषण आपत्काळ आहे आणि त्यामध्ये जगभरातील पुष्कळ लोकसंख्या नष्ट होणार आहे. आपत्काळात तिसरे महायुद्ध भडकेल. दुसर्‍या महायुद्धापेक्षा आता जगातील बहुतेक सर्वच राष्ट्रांकडे महासंहारक अशी अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे ती एकमेकांविरुद्ध डागली जातील. या युद्धामध्ये वाचायचे असेल, तर त्यासाठी अण्वस्त्रे निकामी करणारा प्रभावी उपाय आणि त्या अण्वस्त्रांपासून निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करणाराही उपाय हवा. त्यासाठी ऋषीमुनींनी यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ हा उपाय सांगितला आहे. हा करण्यास अतिशय सोपा आणि अल्प वेळात होणारा; पण प्रभावी असा परिणाम साधून देणारा असा उपाय आहे. त्यामुळे वातावरण चैतन्यदायी बनते आणि संरक्षककवचही लाभते.’ (संदर्भ – सनातनचा ग्रंथ ‘अग्निहोत्र’)
कर्नाटकातील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे संस्थापक प.पू. देवबाबा यांनी ७.२.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी आश्रमात अग्निहोत्र करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आश्रमात त्या दिवशी सायंकाळी त्यांनी त्यांच्या शिष्याकडून अग्निहोत्र करवून घेतले. ‘अग्निहोत्र केल्याचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


१. चाचणीतील निरीक्षणे

या चाचणीत अग्निहोत्र करण्यापूर्वी आणि अग्निहोत्र केल्यानंतर अग्निहोत्र-पात्राची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.
१ अ. अग्निहोत्रानंतर अग्निहोत्र-पात्राच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : अग्निहोत्र-पात्रामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. अग्निहोत्र-पात्रामध्ये आरंभी अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. (त्याच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.) अग्निहोत्र केल्यानंतर अग्निहोत्र-पात्रातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. तिची प्रभावळ १.७० मीटर आली.
सौ. मधुरा धनंजय कर्वे

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. अग्निहोत्रानंतर अग्निहोत्र-पात्रातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होण्याचे कारण : अग्निहोत्र हे यज्ञाचे सर्वांत पहिले, सर्वांगपूर्ण आणि आचरण्यास सोपे अन् सहज रूप आहे. अग्निहोत्रामुळे वातावरणातील रज-तम कणांचे विघटन होऊन वातावरण शुद्ध आणि चैतन्यमय बनते. तसेच अग्निहोत्र करणार्‍या व्यक्तीभोवती संरक्षक-कवच निर्माण होते. अग्निहोत्र-पात्रात गोमयाच्या (गायीच्या शेणाच्या) गोवर्‍याचे लहान तुकडे ठेवून त्यावर गायीचे थोडे तूप घालून अग्नी प्रज्वलित केला जातो. त्यामध्ये मंत्रपूर्वक तूप-मिश्रित चिमूटभर अखंड तांदूळाची आहुती दिली जाते. या सात्त्विक घटकांमध्ये देवतांचे तत्त्व ग्रहण करून प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. अग्निहोत्रामुळे देवतांचे तत्त्व आकृष्ट होऊन ते वातावरणात प्रक्षेपित होते. त्यामुळे वातावरण शुद्ध आणि पवित्र बनते. या चाचणीत संतांच्या शिष्याने अग्निहोत्र केल्यावर वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य निर्माण झाले. त्याचा चांगला परिणाम अग्निहोत्र-पात्रावर झाल्यामुळे अग्निहोत्रानंतर अग्निहोत्र-पात्रातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.३.२०१९)
ई-मेल : [email protected]

घराघरात अग्निहोत्र, यज्ञयाग आणि होम-हवनादी कर्म करणे आवश्यक

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
‘घराघरात चालणारे अग्निहोत्र, ब्रह्मयज्ञकर्म, यज्ञयागादी, तसेच तत्सम् होम-हवनादी कर्म समष्टी साधना म्हणून केल्यास वायूमंडलात त्या त्या वेळी तेजाच्या स्तरावर मंत्रांच्या साहाय्याने झालेले घनीकरण आवश्यक त्या वेळी ढाल बनून या अणूबाँबरूपी कारवायांतून प्रक्षेपित होणार्‍या महाभयानक अशा सूक्ष्म किरणोत्सर्गाला तोंड देऊन त्यांच्याशी लढून त्यांना नष्ट करू शकेल; कारण यज्ञयागातून निर्माण होणारी ऊर्जा ही सूक्ष्मतर स्तरावर कार्य करणारी असल्याने ती सूक्ष्म रूपात कार्यरत असलेल्या रज-तमात्मक अशा किरणोत्सर्गरूपी किरणांना नष्ट करून मानवजातीचे रक्षण करील.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१८.२.२००८)