व्यक्तीच्या चेहर्‍यावरील पालटलेल्या हावभावानुसार तिच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांमध्येही पालट होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘व्यक्तीतील स्पंदने मूलत: तिची आध्यात्मिक पातळी, तिला आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे, तिची साधना इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असतात. व्यक्तीचा चेहरा, विशेषकरून तिच्या डोळ्यांतील भाव जणू तिच्या मनाचा आरसा असतात. तिच्या मनातील विचारांचे प्रतिबिंब तिच्या चेहर्‍यावरील हावभावांच्या रूपात स्पष्टपणे दिसून येते, उदा. व्यक्तीला राग आल्यास तिचा चेहरा रागीट दिसतो, तसेच तिच्या डोळ्यांतून तिच्या मनातील राग व्यक्त होतो. याउलट व्यक्ती आनंदी असल्यास तिचा चेहरा आनंदी दिसतो आणि तिच्या डोळ्यांतून आनंद व्यक्त होतो.

‘व्यक्तीच्या चेहर्‍यावरील हावभाव पालटले की, तिच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांमध्ये काय पालट होतात ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
सौ. मधुरा धनंजय कर्वे

या प्रयोगात आध्यात्मिक त्रास असलेल्या २ साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या २ साधिका यांची आनंदी हावभाव नसलेली अन् आनंदी हावभाव असलेली छायाचित्रे काढून त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.

१ अ. आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि नसलेल्या साधिकांच्या आनंदी हावभाव असलेल्या छायाचित्रांतून अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : या चारही साधिकांच्या आनंदी हावभाव नसलेल्या छायाचित्रांत अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आणि अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. याउलट त्यांच्या आनंदी हावभाव असलेल्या छायाचित्रांत अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप – चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने २३.५० मीटरच्या पुढे अचूक प्रभावळ मोजता आली नाही.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

कु. सोनल जोशी (‘आनंदी हावभाव नसलेली’)

२ अ. व्यक्तीच्या मनाची स्थिती पालटली की तिच्या चेहर्‍यावरील हावभावात आपोआप पालट होणे : दैनंदिन जीवनात व्यक्तीला प्रतिदिन विविध प्रसंगांना किंवा परिस्थितींना सामोरे जावे लागते. काही कठीण प्रसंगांमध्ये तिला स्थिर न रहाता आल्याने ती दुःखी किंवा उदास होते. याउलट काही सुखदायक प्रसंग घडले की, ती आनंदी होते. थोडक्यात तिच्या मनाची स्थिती पालटते, तसे तिच्या चेहर्‍यावरील हावभावही आपोआप पालटतात. तिच्या पालटलेल्या हावभावानुसार तिच्याकडून वातावरणात तशी स्पंदने प्रक्षेपित होतात. तिच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चांगल्या किंवा त्रासदायक स्पंदनांचा परिणाम तिच्या सभोवतालीसुद्धा होतो, उदा. एखाद्या दुःखी किंवा उदास व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्या मनाला चांगले वाटत नाही. याउलट उत्साही किंवा आनंदी व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्याला चांगले वाटते.

कु. सोनल जोशी (‘आनंदी हावभाव असलेली’ )

२ आ. सतत आनंदी रहाण्याचे महत्त्व लक्षात घ्या ! : व्यक्तीची स्पंदने तिच्या छायाचित्रातून प्रक्षेपित होतात. आपण नेहमी अनुभवतो की ‘कॅमेर्‍या’ने (छायाचित्रकाने) छायाचित्र काढणारी व्यक्ती आपले छायाचित्र काढण्यापूर्वी म्हणते, ‘‘स्माईल प्लीज’’, म्हणजे ‘कृपया हसा’. आपण छानसे स्माईल दिले की, ती लगेच आपले हसरे छायाचित्र टिपते. आपल्या हसर्‍या छायाचित्राकडे पाहून स्वतःला, तसेच ते पहाणार्‍यालाही आनंद होतो. चाचणीतील साधिकांच्या आनंदी हावभाव नसलेल्या छायाचित्रांच्या तुलनेत त्यांच्या आनंदी हावभाव असलेल्या छायाचित्रांत सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पुष्कळ अधिक, तर नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पुष्कळ अल्प आहे. यातून हसण्याची केवळ मुद्रा केली, तरी व्यक्तीवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण न्यून होऊन तिची सात्त्विकता वाढते, तर जीवनात खराखुरा आनंद मिळाला तर किती लाभ होत असेल !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.१.२०२३)
ई-मेल : [email protected]

आनंद मिळावा, अशी इच्छा का होते ?

‘आनंदाचे कोटी । साठविल्या आम्हा पोटी ।’
‘आनंदाचे डोही । आनंद तरंग । आनंदचि अंग । आनंदाचे ।।’- संत तुकाराम महाराज

भावार्थ : आनंद हा आपल्यातच साठवलेला असतो. साधना केल्यावर आपल्याला आनंदाची अनुभूती येते. शरीररूपी डोहात आनंदरूपी तरंग उमटतात. संपूर्ण शरीरभर आनंदच आनंद जाणवतो. स्वतःमध्ये असलेल्या आनंदाची अनुभूती                 आल्यावर चराचरातील आनंदाची अनुभूती येते.

आनंद हा जिवाचा आणि विश्वाचा स्थायीभाव, स्वभाव, स्वधर्म आहे; म्हणून जिवाची स्वाभाविक प्रवृत्ती मूळ स्वरूपात जाण्याकडे, म्हणजे आनंद मिळवण्याकडे आणि मूळ स्वरूपात गेल्यावर येणार्‍या आनंदाची अनुभूती टिकवण्याकडे असते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म (सुख, दु:ख अन् आनंद यांचे शास्त्रीय विश्लेषण)’)         

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.