व्यंगचित्रकार श्री. गुरु खिलारे यांच्या ‘मनातील गप्पा’ या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनास प्रारंभ

बेळगाव – सांगली येथील व्यंगचित्रकार श्री. गुरु खिलारे यांच्या ‘मनातील गप्पा’ या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनास २८ जानेवारीपासून प्रारंभ झाला. वरेरकर नाट्य संघाच्या कलामहर्षी के.बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन पहाण्यास विनामूल्य खुले आहे. हे प्रदर्शन ३० जानेवारीपर्यंत असणार आहे. श्री. गुरु खिलारे हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यंगचित्रे रेखाटत असून त्यांची व्यंगचित्रे दैनिक ‘तरुण भारत’ येथून प्रसिद्ध होत आहेत. तरी अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.