‘साम्राज्‍य-संस्‍थापक’ बाजीराव पेशव्‍यांची महानता !

  • ‘थोरले बाजीराव पेशवे यांनी शिवरायांच्‍या हिंदवी स्‍वराज्‍याचा विस्‍तार संपूर्ण देशभर केला !’ – पंडित धर्मवीर आर्य, हिंदु स्‍वाभिमान प्रतिष्‍ठान, पुणे.
  • ‘जगाच्‍या इतिहासात ‘अपराजित सेनापती’ म्‍हणून श्रीमंत बाजीराव पेशवे (थोरले) हेे एकमेव सेनापती होते !’ – प्रा. मोहन शेटे, इतिहाससंशोधक, पुणे.
  • ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍याचे रूपांतर थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्‍या साम्राज्‍यात पूर्ण केले !’ – श्री. पांडुरंग बलकवडे, ज्‍येष्‍ठ इतिहाससंशोधक, पुणे.
  • ‘संपूर्ण भारत इंग्रजांच्‍या कह्यात गेल्‍यानंतरही ज्‍याला ‘पळपुटा’ म्‍हणून हिणवले गेले, त्‍या दुसर्‍या बाजीराव पेशव्‍यांनी १८ वर्षे इंग्रजांशी झुंज दिली, हे लक्षात घेतले पाहिजे.’ – भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्‍पात

अतुलनीय पराक्रम गाजवून मुसलमान राजांवरही धाक बसवणारे बाजीराव पेशवे !

‘बाजीराव पेशवे यांच्‍या मातोश्रींना तीर्थाटनाला जायचे होते. त्‍यांनी आईसमवेत ४ नोकर पाठवले आणि तीर्थाटनास जाण्‍यास सांगितले. त्‍यांच्‍या आई ज्‍या ज्‍या राज्‍यांतून गेल्‍या, तेथील मुसलमान राजे आणि सरदार यांनी त्‍यांचे केवळ स्‍वागतच केले नाही, तर पुढील राज्‍यापर्यंत सुखरूप पोचवण्‍याची काळजीही घेतली. आई तीर्थाटन करून परत आल्‍यावर पेशव्‍यांना म्‍हणाल्‍या, ‘‘तू म्‍हटल्‍याप्रमाणे मला कोणताही त्रास न होता तीर्थयात्रा पूर्ण झाली.’’ हे सर्व घडण्‍यास पेशव्‍यांची असलेली जरब कारणीभूत ठरली. ‘पेशव्‍यांशी वाईटपणा नको’ म्‍हणून मोगलांनी त्‍यांच्‍या आईची पूर्ण काळजी घेतली.’ – श्री. नितीन वाडीकर, उद्योजक, कोल्‍हापूर.